Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साडे चार लाखांच्या आर्थिक व्यवहारातून तरुणीची धारदार शस्त्राने वार करुन हत्या, पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime : पुण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. बहुराष्ट्रीय कंपनीच्या बीपीओच्या पार्किंगमध्ये एका महिला कर्मचारीवर तिच्या सहकाऱ्याने धारदार शस्त्राने हल्ला केला. जमहिला कर्मचाऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झाल

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 08, 2025 | 01:27 PM
साडे चार लाखांच्या आर्थिक व्यवहारातून तरुणीची धारदार शस्त्राने वार करुन हत्या

साडे चार लाखांच्या आर्थिक व्यवहारातून तरुणीची धारदार शस्त्राने वार करुन हत्या

Follow Us
Close
Follow Us:

Pune Crime News Marathi: पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कर्जाच्या वादातून बीपीओमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची तिच्या सहकाऱ्याने हत्या केली. धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिला बीपीओ कर्मचारीचा रुग्णालयात मृत्यू झाला. पुण्यात मंगळवारी (7 जानेवारी) सायंकाळी ही घटना घडली. बहुराष्ट्रीय बीपीओ कंपनीच्या पार्किंगमध्ये घडलेल्या या घटनेनंतर सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून महिलेचा तिच्या कार्यलयातील पुरुष सहकाऱ्याने तिच्यावर अनेकवेळा हल्ला केल्याचे समोर आले आहे. यामध्ये तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली. यामुळे महिलेचा मृत्यू झाला.

पुणे, रामवाडीत येथील नामांकित कंपनीच्या पार्किंगमध्ये सहकारी तरुणीवर धारधार हत्याराने केलेल्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या तरूणीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. आर्थिक वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघेही या कंपनीत अंकाऊटिंग विभागात काम करत होते. साडे चार लाख रुपये तरुणीला हात उसने म्हणून दिले होते. त्यावरून त्यांच्यात वादावादी होती.

विद्यार्थिनींचा पाठलाग करून फोटो काढणाऱ्या ‘त्या’ दोघांना अटक; पोलिसांची चौकशी सुरु

बीपीओ पार्किंगमधील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा येथील बहुराष्ट्रीय बीपीओच्या पार्किंगमध्ये 7 जानेवारीला, सायंकाळी ६.१५ च्या सुमारास ही घटना घडली. शुभदा शंकर कोदरे (वय 28, रा. कात्रज) असे पीडित महिलेचे नाव आहे. कृष्णा सत्यनारायण कनोजा (३०) असे हल्लेखोराचे नाव असून तो शिवाजीनगर येथील रहिवासी आहे. हिंमत जाधव, डीसीपी झोन-4, पुणे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासातून समोर आले आहे की पीडित आणि हल्लेखोर दोघेही एकाच बहुराष्ट्रीय बीपीओ (डब्ल्यूएनएस ग्लोबल) मध्ये अकाउंटंट म्हणून काम करत होते.

पैशाच्या व्यवहारात खून

तरुणी मूळची चिपळून येथील आहे. ती कुटूंबियासोबत साताऱ्यात स्थाईक झाली होती. तर आरोपी कृष्णा हा मुळचा उत्तरप्रदेशातील आहे. तो गेल्या दहा वर्षांपासून पुण्यातच आहे. त्यामुळे त्याला मराठी व्यवस्थित बोलता येते. दरम्यान, दोघेही डब्ल्युएनएस या कॉल सेंटर असलेल्या कंपनीत काम करत होते. दरम्यान, त्यांच्यात काही पैशांची देवाण-घेवाण झाली होती. त्यावरून त्यांच्यात वादावाद देखील होते. तरुणीकडून कृष्णा पैसे मागत होता. मंगळवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास तरुणी काम संपवून पार्किंगमध्ये आली. ती तिच्या वाहनाने जाणार असतानाच तेथे थांबलेल्या कृष्णाने तरुणीशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने थेट भाजी कापण्याच्या चाकूने तिच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर कंपनीतील कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी तेथे धाव घेतली. तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. येरवडा पोलिसांना घटनेची माहिती त्यांनी तेथे धाव घेतली. पोलीस उपायुक्त हिमत जाधव व अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच आरोपी कृष्णा याला ताब्यात घेतले. त्याला अटक केली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

माणुसकीला काळीमा फासणारी घटना: 500 रुपयांसाठी वाद, सख्ख्या भावाने केली भावाची हत्या

Web Title: Bpo employee dies after knife attack by male colleague in office parking lot in pune crime marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 01:27 PM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद
1

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…
2

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी
3

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी

आधी गोडसेंच्या वंशजांकडून जीविताला धोक्याचा दावा; काहीच वेळात ‘घुमजाव’; राहुल गांधींचं नेमकं चाललंय काय?
4

आधी गोडसेंच्या वंशजांकडून जीविताला धोक्याचा दावा; काहीच वेळात ‘घुमजाव’; राहुल गांधींचं नेमकं चाललंय काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.