Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: पुण्याच्या कोथरूडमध्ये चोरट्यांचा उच्छाद; साडे चार लाखांचा ऐवज लंपास

तक्रारदार दोन दिवसांपूर्वी बाहेरगावाहून परतले. तेव्हा फ्लॅट कुलूप तुटल्याचे लक्षात आले. त्यांनी फ्लॅटची पाहणी केली. तेव्हा फ्लॅटमधून ऐवज चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 12, 2025 | 06:44 PM
Pune Crime News: पुण्याच्या कोथरूडमध्ये चोरट्यांचा उच्छाद; साडे चार लाखांचा ऐवज लंपास

Pune Crime News: पुण्याच्या कोथरूडमध्ये चोरट्यांचा उच्छाद; साडे चार लाखांचा ऐवज लंपास

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: कोथरूड परिसरातील मयूर कॉलनीत कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील साडेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. मयूर कॉलनी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला. याबाबत एका व्यक्तीने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार मयूर कॉलनी परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. तक्रारदार आणि कुटुंबीय ८ जानेवारी रोजी बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी बंद फ्लॅट कुलूप तोडले. तसेच बेडरूममधील कपाट उचकटून चोरट्यांनी चार लाख ४१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले.

तक्रारदार दोन दिवसांपूर्वी बाहेरगावाहून परतले. तेव्हा फ्लॅट कुलूप तुटल्याचे लक्षात आले. त्यांनी फ्लॅटची पाहणी केली. तेव्हा फ्लॅटमधून ऐवज चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सहायक आयुक्त भाऊसाहेब पठारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक निरीक्षक बालाजी सानप तपास करत आहेत.

महिलेच्या पर्समधून सव्वा लाखांचे दागिने चोरले

खडकी बाजार परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील २ लाख २७ हजारांचे दागिने चोरून चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, पैसे देण्यासाठी पर्स काढल्यानंतर त्यांच्यामधील ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात ४१ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

हेही वाचा: Crime: राहायला सासवडला, चोरी पुण्यात अन् विक्री थेट…; झोपडीत राहणाऱ्या चोराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मोबाईल शॉपी फोडून दीड लाखांचा ऐवज चोरली

फुरसुंगीतील मंतरवाडा चौकातील एस.एस. मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी चोरट्यांनी १ लाख ६१ हजार रुपयांची ऐवज चोरून पोबारा केला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात २४ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे.

पुण्यातील मांजा विक्रेत्यांवर कारवाई

नायलॉन तसेच चायनिज मांजावरील कारवाई तीव्र करत पोलिसांनी शहरातील सहकारनगर, चतुःश्रुंगी, विश्रांतवाडी, वारजे आणि मार्केटयार्ड भागातील पाच नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई केली. त्यांच्यावर संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून ३६ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मकरसंक्राती सणाच्या निमित्ताने शहरात पतंग उडविले जातात. मात्र, यासाठी घातक अशा नायलॉन मांजाचा वापर करतात. या मांजामुळे पशु – पक्ष्यांसह नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. हा मांजा विकणे बेकायदेशीर आहे. अशा विक्रेत्यांवर कारवाईच्या सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केल्या होत्या. त्यानूसार विविध भागात पोलिसांनी कारवाई करून नायलॉन मांजा जप्त केला.

 

Web Title: Burglary at kothrud mayur colony pune police file case against accused crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 06:28 PM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

Pune News: मोठी बातमी! पुण्यातील गणेश मंडळांचा ‘हा’ वाद अखेर मिटला; मंत्री मोहोळांच्या पुढाकराने सुटला प्रश्न
1

Pune News: मोठी बातमी! पुण्यातील गणेश मंडळांचा ‘हा’ वाद अखेर मिटला; मंत्री मोहोळांच्या पुढाकराने सुटला प्रश्न

पुण्यातील बेशिस्त वाहतुकीवर, अपघातांवर नियंत्रण कसे मिळवणार? पहा काय म्हणाले RTO अधिकारी? वाचा सविस्तर मुलाखत
2

पुण्यातील बेशिस्त वाहतुकीवर, अपघातांवर नियंत्रण कसे मिळवणार? पहा काय म्हणाले RTO अधिकारी? वाचा सविस्तर मुलाखत

Pune Velhe Taluka News: आता वेल्हे नाही, ‘राजगड’ म्हणा! महसूल मंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय
3

Pune Velhe Taluka News: आता वेल्हे नाही, ‘राजगड’ म्हणा! महसूल मंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
4

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.