Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shikrapur Shirur Highway Project: पुणे-शिरूर ६ पदरी महामार्गाच्या खर्चात तफावत?; दोन दिवसांत बाधित शेतकऱ्यांची मोठी बैठक

या आकडेवारीतील कथित तफावत स्पष्ट करून प्रकल्पाच्या खर्चाची पारदर्शक माहिती सार्वजनिक करावी. तसेच, प्रकल्पातील कथित अनियमितता, खर्चातील तफावत आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 15, 2026 | 05:20 PM
Pune Shirur Highway, NH 753F, Shikrapur, Shirur, Sanjay Pachange,

Pune Shirur Highway, NH 753F, Shikrapur, Shirur, Sanjay Pachange,

Follow Us
Follow Us:
  • पुणे ते शिरूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अनियमिततेचा आरोप.
  • शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न, नुकसानभरपाई आणि प्रकल्पाच्या खर्चातील कथित तफाव
  • शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न ऐरणीवर
Shikrapur News: शिरूर येथील पुणे ते शिरूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफ या प्रस्तावित महामार्गाच्या कामात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच बाधित शेतकऱ्यांना मोजणी, हद्द निश्चिती आणि नुकसानभरपाई मिळेपर्यंत संबंधित कामे सुरू करू नयेत, अशी मागणी क्रांतिवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय शिवाजी पाचंगे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना निवेदन दिले आहे.

शिक्रापूर, ता. शिरूर येथील पुणे ते शिरूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफ या महामार्गाच्या कामात शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न, नुकसानभरपाई आणि प्रकल्पाच्या खर्चातील कथित तफावत यांसारखे गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. बाधित शेतकऱ्यांना मोबदला न देता आणि त्यांच्या तक्रारींचे निराकरण न करता सध्या शेतकऱ्यांच्या जमिनींवरील जुन्या झाडांची कत्तल करून कामे सुरू आहेत.

MPSCच्या अभ्यासात जुळले सूर, PSI होण्यासाठी दिले 2.20 लाख, त्याच पतीने मागितले 40 लाख; प्रेमविवाहाची धक्कादायक कहाणी!

ऑगस्ट २०२५ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेनुसार, पुणे ते शिरूर राष्ट्रीय महामार्गाच्या सुमारे ५३.४० किलोमीटर लांबीच्या सहापदरी प्रकल्पासाठी ४,१०४ कोटी रुपये इतका अंदाजित बांधकाम खर्च निश्चित करण्यात आला होता. मात्र, इतर प्रशासकीय तपशिलांमध्ये प्रकल्पाची लांबी आणि खर्च याबाबत वेगवेगळी आकडेवारी समोर आली आहे.

या आकडेवारीतील कथित तफावत स्पष्ट करून प्रकल्पाच्या खर्चाची पारदर्शक माहिती सार्वजनिक करावी. तसेच, प्रकल्पातील कथित अनियमितता, खर्चातील तफावत आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. चौकशी पूर्ण होऊन बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळेपर्यंत संबंधित कामे पुढे सुरू ठेवू नयेत, अशी मागणी क्रांतिवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय पाचंगे यांनी केली आहे. याबाबत दोन दिवसांत सर्व शेतकऱ्यांची मोठी बैठक आयोजित करण्यात आल्याचेही संजय पाचंगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

‘छत्रपती’चा गळीत हंगाम सुरू, ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; सभासदांसह गेटकेन ऊसालाही समान दर देण्याची ग्वाही

उन्नत मार्ग व टोल कालावधीबाबत आक्षेप

पुणे ते शिरूर महामार्ग प्राकल्पाच्या आराखड्यातील बदल, उन्नत मार्गाची लांबी, बांधकाम खर्च आणि टोल वसुलीच्या कालावधीबाबत पुरेशी माहिती उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप करत सहा पदरी महामार्ग, उन्नत मार्ग आणि संबंधित कामांच्या खर्चाचा तपशील सार्वजनिक करावा तसेच टोल वसुलीचा कालावधी किती असेल, याची स्पष्ट माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न ऐरणीवर

पुणे ते शिरूर महामार्गासाठी जमीन संपादित होत असलेल्या शेतकऱ्यांची मोजणी, हद्द निश्चिती आणि नुकसानभरपाईची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय त्यांच्या जमिनींवरील कामे सुरू करू नयेत अशी मागणी करण्यात आली असताना काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील उभी झाडे तोडण्यात आली असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानभरपाईची प्रक्रिया पूर्ण करावी आणि प्रकल्पाशी संबंधित सर्व महत्त्वाची कागदपत्रे नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी करण्यात आहे.

Web Title: Pune shirur national highway 753f irregularities alleged by sanjay pachange

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • Maharashtra Road Transport
  • Pune

संबंधित बातम्या

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन
1

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.