Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विरारमधील घरफोडीचा लावला छडा; 15 गुन्ह्यातील घरफोड्या गजाआड

विरार पूर्व परिसरातील रहिवासी फिर्यादी दीपक देऊ कुंभार (वय ५८) यांचे घर १० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी बंद होते. दुपारी २.३० ते २.४५ या केवळ पंधरा मिनिटांच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 21, 2026 | 03:18 PM
विरारमधील घरफोडीचा लावला छडा; 15 गुन्ह्यातील घरफोड्या गजाआड

विरारमधील घरफोडीचा लावला छडा; 15 गुन्ह्यातील घरफोड्या गजाआड

Follow Us
Follow Us:
  • विरारमधील घरफोडीचा लावला छडा
  • छत्रपती संभाजीनगरमधून घेतले ताब्यात
  • बेडरूममधील कपाटाची तिजोरी उचकटली
वसई : विरार पूर्व येथे भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून तब्बल दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास करणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा घरफोड्याला अटक करण्यात मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा कक्ष-३ ला मोठे यश आले आहे. आरिफ याकुब शेख (वय ३१, रा. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे तब्बल १५ गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे.

विरार पूर्व परिसरातील रहिवासी फिर्यादी दीपक देऊ कुंभार (वय ५८) यांचे घर १० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी बंद होते. दुपारी २.३० ते २.४५ या केवळ पंधरा मिनिटांच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटाची तिजोरी उचकटून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २००००० रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला होता. याप्रकरणी विरार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

डिजिटल अरेस्टची पुन्हा घटना; मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्याची धमकी देत 71 लाख लुटले

पोलिस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलिस आयुक्त संजय शिंत्रे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-३ चे प्रभारी पोलिस निरीक्षक समीर शेख, सहायक पोलिस निरीक्षक अमोल तळेकर, पोलिस उपनिरीक्षक मंगेश वडणे, प्रकाश तुपलोंढे, श्रेणी उपनिरीक्षक रामचंद्र पाटील, अंमलदार व सायबर पोलिस ठाण्याचे संतोष चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

छत्रपती संभाजीनगरमधून घेतले ताब्यात

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा कक्ष-३ च्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या आधारे तपास सुरू केला. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने थेट छत्रपती संभाजीनगर येथे सापळा रचून आरोपी आरिफ शेख याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने विरारमधील घरफोडीची कबुली दिली असून, त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी विरार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Web Title: Burglary in virar solved nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 03:18 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.