Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून 15 लाखांना लुटले; महिलेसह चौघांना बेड्या

पुष्पा साळवे या महिलेने छत्रपती संभाजीनगर शहरातील एका नामांकित सराफा व्यापाऱ्याशी प्रथम मैत्री केली. त्यानंतर या दोघांमध्ये व्हॉट्सऍपवर बोलणे सुरू झाले. काही व्हिडिओची देखील देवाण-घेवाण झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 30, 2025 | 11:40 AM
हनी ट्रॅप रचणारे चार जण पोलिसांच्या जाळ्यात

हनी ट्रॅप रचणारे चार जण पोलिसांच्या जाळ्यात

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एका व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून 15 लाख रुपये लुटणाऱ्या एका महिलेसह चौघांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सिटी चौक पोलिसांनी मंगळवारी रात्री रंगारगल्लीत ट्रॅप लावून 24 वर्षांच्या महिलेला 20 हजार रुपये रोख घेताना ताब्यात घेतले आहे.

हेदेखील वाचा : ‘लाडकी बहीण’नंतर आता राज्यातील तब्बल 5 लाख महिलांना सरकारकडून मिळणार ‘हे’ गिफ्ट; आदिती तटकरेंची माहिती

पुष्पा साळवे (वय २४), अर्जुन लोखंडे (वय ३०), हनी भूषण चव्हाण (वय १८), क्रिस्टल नीलेश रानडे (वय २०), आदित्य शेरे (सर्व, रा. भावसिंगपुरा) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. पुष्पा साळवे या महिलेने छत्रपती संभाजीनगर शहरातील एका नामांकित सराफा व्यापाऱ्याशी प्रथम मैत्री केली. त्यानंतर या दोघांमध्ये व्हॉट्सऍपवर बोलणे सुरू झाले. काही व्हिडिओची देखील देवाण-घेवाण झाली. यातून झालेल्या अश्लील संवादातून मागील आठ महिन्यांपासून व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली होती.

बंदुकीसह 20 हजार रक्कम जप्त

ब्लॅकमेलिंगचा प्रकार वाढल्याने शेवटी व्यापऱ्याने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर एसीपी संपत शिंदे, पीआय परदेशी यांच्या पथकाने मंगळवारी रात्री या टोळीला सापळा लावून शहराच्या रंगारगल्ली परिसरातून अटक केली. यावेळी पुष्पा साळवे, आदित्य शेरे, अर्जुन लोखंडे, हनी भूषण चव्हाण, क्रिस्टल नीलेश रानडे यांच्या ताब्यातून एक बंदूक आणि 20 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

व्यापाऱ्याकडून 15 लाख उकळले

आतापर्यंत या टोळीने व्यापाऱ्याकडून सुमारे 10 ते 15 लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या टोळीने अजून काही व्यापाऱ्यांनाही फसवले असल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. तर या प्रकरणातील आरोपी महिलेचा पती देखील सराईत गुन्हेगार असून तो सध्या एमपीडीएमध्ये कारागृहात असल्याची माहिती दिली जात आहे.

वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक

राज्यात फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये प्रवेश सुरू झाल्यानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी तसेच इंजिनिअरींग व इतर महत्वाच्या शाखा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्याच्या आमिषाने फसवणूक करणारी टोळी पुण्यात सक्रिय असल्याचे दिसते. दरवर्षी प्रवेशाच्या निमित्ताने फसवणूक होते. परंतु, या टोळ्या मात्र समोर येत नसल्याचे दिसते.

हेदेखील वाचा : Santosh Deshmukh Case: सौरभ भोंडवेचा अपघात की घातपात? संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडमधील अनेक खूनप्रकरणे उजेडात

Web Title: Businessman trapped in honey trap and robbed of rs 15 lakh nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • Robbery case

संबंधित बातम्या

दरोड्याच्या तयारीत असलेल्या तरुणांना गोंदियात अटक; कोयत्यासह धारदार शस्त्रही जप्त
1

दरोड्याच्या तयारीत असलेल्या तरुणांना गोंदियात अटक; कोयत्यासह धारदार शस्त्रही जप्त

ठाण्यात रक्षाबंधनाच्या दिवशीच लाडक्या बहिणीच्या घरी चोरी, ९ लाख ६३ हजार किंमतीचे दागिने गायब
2

ठाण्यात रक्षाबंधनाच्या दिवशीच लाडक्या बहिणीच्या घरी चोरी, ९ लाख ६३ हजार किंमतीचे दागिने गायब

Crime News: उरळी कांचनमध्ये दोन मोबाईल शॉपी फोडल्या; तब्बल 75 लाखांचा ऐवज केला लंपास
3

Crime News: उरळी कांचनमध्ये दोन मोबाईल शॉपी फोडल्या; तब्बल 75 लाखांचा ऐवज केला लंपास

साताऱ्याच्या दौलतगनर येथे मोठी घरफोडी; तब्बल 13 तोळे वजनाचे सोने चोरलं
4

साताऱ्याच्या दौलतगनर येथे मोठी घरफोडी; तब्बल 13 तोळे वजनाचे सोने चोरलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.