
Nasarapur Case, Pune Crime, CCTV Footage,
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलांनी आरोपी कांबळेला अत्यातार करताना रोखण्याचा प्रयत्न केला होता. पण आरोपीने त्यांच्यावर दगड फेकून त्यांना पळवून लागल्याचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. पोलिसांनी हे महत्त्वाचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्या प्रत्यक्षदर्शी मुलांची ई- साक्षही नोंदवून घेतली आहे. या पुराव्यामुळे आरोपीचा क्रूरपणा पुन्हा एकदा समोर आला असून या पुराव्यामुळे या प्रकरणाला अधिक गती मिळणार आहे.
या प्रकरणातील आरोपीला आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आला आहे. आरोपीला आज ऑनलाईन पद्धतीने न्यायालयात हजर करण्यात आले होते. शिवाजीनगर सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत आरोपीला ‘पोलिसांविरोधात काही सांगायचे आहे का’, असे विचारण्यात आले असता त्याने ‘नाही’ असे उत्तर दिले. युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीला १४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असून, सरकारने या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती केली आहे. प्रकरणाची सुनावणी जलदगतीने आणि प्रभावीपणे पार पडावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय, या प्रकरणासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्याबाबत राज्य सरकार अध्यादेश काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी वकील म्हणून नियुक्तीनंतर अजय मिसर यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण तपासाचा आढावा घेतला. यावेळी ग्रामीण पोलिसांकडून तपासाची सविस्तर माहिती घेण्यात आली असून, तपास पथकाने आतापर्यंत केलेल्या कारवाईचाही त्यांनी आढावा घेतला.