
Chhattisgarh Naxal Attack:
Chhattisgarh Naxal Attack: छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भीषण आयईडी (IED) स्फोटात सुरक्षा दलाचे ११ जवान जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील करेगुट्टा हिल्स परिसरात ही घटना घडली असून, जखमींमध्ये १० स्थानिक पोलीस दलाचे तर १ कोब्रा बटालियनच्या जवानाचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाचे जवान या परिसरात शोधमोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी एकापाठोपाठ एक अनेक आयईडी स्फोट घडवून आणले. या स्फोटांच्या तीव्रतेमुळे सुरक्षा दलाचे मोठे नुकसान झाले. बिजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आणि सर्व जखमी जवानांना घटनास्थळावरून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.जखमी जवानांची प्रकृती विचारात घेऊन त्यांना तात्काळ विमानाने (Air-lift) उपचारासाठी राज्याची राजधानी रायपूर येथे हलवण्यात आले आहे.
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टा हिल्स परिसरात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भीषण आयईडी (IED) स्फोटात ११ सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. यामध्ये राज्य पोलिसांच्या डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड (DRG) मधील १० जवान आणि सीआरपीएफच्या ‘कोब्रा’ (CoBRA) युनिटच्या एका सब-इन्स्पेक्टरचा समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने रायपूर येथील रुग्णालयात एअरलिफ्ट करण्यात आले आहे.
जखमींची प्रकृती आणि ओळख जखमी झालेल्या कोब्रा युनिटच्या अधिकाऱ्याची ओळख २१० व्या बटालियनचे सब-इन्स्पेक्टर रुद्रेश सिंह अशी झाली आहे. सिंह आणि दोन डीआरजी सैनिकांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, अन्य तीन जवानांच्या डोळ्यांना गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मालेगावमध्ये ध्वजारोहण कार्यक्रमाला गालबोट; परेड ग्राऊंडजवळ झाला भीषण स्फोट, 5 जण जखमी
बस्तरमध्ये नक्षलवाद्यांविरुद्धची मोहीम तीव्र हा हल्ला होण्यापूर्वी काही दिवसांपूर्वीच सुरक्षा दलांनी बस्तर रेंजमध्ये सहा नक्षलवाद्यांना ठार केले होते. त्या कारवाईत दोन AK-47, INSAS रायफल आणि BGL लाँचर असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. शनिवारीदेखील विजापूरच्या वायव्य भागात झालेल्या चकमकीत दोन माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.
३१ मार्चची डेडलाईन केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून माओवाद पूर्णपणे संपवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सरकारी आकडेवारीनुसार:
२०२५ ची कामगिरी: पहिल्या ११ महिन्यांत ३३५ नक्षलवादी ठार, ९४० अटक आणि २,१६७ जणांचे आत्मसमर्पण.
२०१४ ते २०२५: आतापर्यंत १,८०० हून अधिक
नक्षलवादी ठार तर १६,००० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
प्रभावित क्षेत्र: नक्षलवादाचा प्रभाव आता केवळ छत्तीसगडमधील बिजापूर, सुकमा आणि नारायणपूर या तीन जिल्ह्यांपुरता मर्यादित राहिला आहे.
टर्निंग पॉइंट गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरक्षा दलांनी ‘तडपाला’ गावात आपला तळ उभारला होता, जे पूर्वी माओवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान मानले जात होते. या तळावरून सातत्याने चालवलेल्या मोहिमांमुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले असून, बिथरलेल्या नक्षलवाद्यांनी आता आयईडी स्फोटांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.