jharkhand News: सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांच्या विरोधात पेट्रोलिंग करण्यासाठी सीआरपीएफचे पथक गस्तीवर निघाले होते. याच दरम्यान नक्षलवाद्यांनी आयईडी ब्लास्ट केला.
केंद्र सरकारने २०२४ मध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली होती. दरम्यान बुधवारी छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश आलं. चकमकीत २६ हून अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं.
छत्तीसगडमधील नारायणपूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू आहे. या चकमकीत २६ हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत. तर एक जवान शहीद झाला आहे.
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नक्षलवाद्यांनी काँग्रेस नेत्याची हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या हत्येने नारीकांमध्ये खळबळ उडाली आहे आणि भीतीच वातावरण आहे.
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा जवान आणि नक्षलवादींमध्ये चकमक झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांच्या विरोधात आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे.
गेल्या वर्षभरात आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात सातत्याने चकमक होत आहे. गेल्या काही महिन्यांत सुरक्षा यंत्रणेला नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठे यश प्राप्त झाले आहे.
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी १२ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. त्याच वेळी, ३-४ सैनिक जखमी झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.
छत्तीसगडमधील सुकमा भागात नक्षलवाद्यांनी आयईडी (IED) स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात कोब्रा बटालियनचे दोन जवान शहीद झाले आहेत. असे सांगण्यात येत आहे की, सैनिकांच्या हालचालीदरम्यान त्यांना आयईडीचा स्फोट झाला.
छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी भाजप नेत्या कोमल मांझी (Komal Manjhi) यांची गळा चिरून हत्या केली. कोमल मांझी या शनिवारी सकाळी मंदिरातून परतत असताना आलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांना पकडून त्यांचा गळा चिरला.
दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवाद्यांनी बुधवारी दुपारी सुरक्षा दलाच्या ताफ्यात सामील असलेल्या एका वाहनाला उडवलं. या घटनेत 10 पोलीस कर्मचारी आणि एका चालकाचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. यामध्ये ४ नक्षलवादी ठार झाले. या चकमकीत महाराष्ट्र पोलिसांचा C-60 कमांडर सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी दोन लाखांचे…
नक्षलवादी चळवळीला कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे. घनदाट जंगलात सुरक्षा दलांची कारवाई नक्षल्यांसाठी सध्या चिंतेचा विषय नसून कोरोनामुळे नक्षल्यांचे जगणे कठीण झाले आहे. तेलंगाणा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशापर्यंत…
गडचिरोलीतील (gadchiroli) पयडी-कोटमी जंगलात आज 'सी ६०' पोलिस पथक (C60 police force) आणि नक्षलवाद्यांमध्ये (naxal) मोठ चकमक उडाली. यामध्ये १३ नक्षलवादी ठार (13 naxal killed) झाले. यापैकी ८ जणांचे मृतदेह…