मल्हारगडावर प्रेमी युगुलांचा पर्यटकावर जीवघेणा हल्ला; डोक्यात दगड आणि..., प्रकरण काय?
सासवड: पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळे आणि तीर्थक्षेत्रे असल्याने पर्यटक मोठ्या संख्येमध्ये येत आहेत, त्याचबरोबर प्रेमी युगुल येत आहेत. प्रेमी युगुलांकडून प्राचीन मंदिरे तसेच गड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात अश्लील कृत्ये केली जातात, युगुलास अश्लील चाळे करताना हटकल्याने त्याच राग धरून थेट डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एक पर्यटक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
प्रमोद मोहन जगताप (वय २८, जगताप मळा आळंदी म्हातोबाची, ता. हवेली, जि. पुणे) असे जखमी पर्यटकाचे नाव आहे. याप्रकरणी वेदांन्त राजेंद्र जाधव (रा. बी. टी. कवडे रोड, घोरपडी पुणे) आणि एक अज्ञात मुलीवर सासवड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, जखमी पर्यटक प्रमोद जगताप हे गड किल्ले संवर्धनाचे काम करतात. तसेच माउंटन ट्रेल रेसच्या सरावासाठी आठवड्यातुन तीन ते चार वेळा धावत मल्हारगड येथे येत असतात. दरम्यान दि. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान जगताप हे मल्हारगडाकडे धावत निघाले होते.
मल्हारगडावरील महादेव व खंडोबा मंदीरात दर्शन घेऊन ते गडावर गडफेरी करीत असताना मला झेंडेंवाडी बाजुकडील गडाचे दरवाजा शेजारी असणाऱ्या बुरुजाच्या तटबंदीच्या आडोशाला वेदांत मुलीसोबत अश्लील चाळे करताना दिसला. यावेळी जगताप यांनी ताई-दादा अशी अश्लील चाळे करण्याची ही जागा नाही असे समजावुन सांगत असताना गडकिल्ला तुझे बापाचा आहे का? असे म्हणुन वेदांतने मारहाण केली. दरम्यान सोबत सोबत असलेल्या मुलीने दगड दगडाने मारहान केली. त्यांच्याशी झटापट करत सुटका करून घेतली. संशयितांनी त्यांच्या खिशातील २१०० रुपये काढून घेतले. धनलक्ष्मी ह़ॉटेल जवळ येवून मित्र कुंडलीक जाधव याला बोलावून घेतले व सासवड पोलिसात फिर्याद दाखल केली. सासवडचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश पाटील अधिक तपास करीत आहेत.
राज्यातील गड किल्ले आपली ओळख आह. याच गड किल्यावर अश्लील कुत्ये तरुण पिढी कडून केले जात आहेत. तसेच त्यांना विरोध करणाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने गुन्हेगारांना अटक करून कारवाई करावी. अन्यथा याचे राज्यभर पडसाद उमटतील असा थेट इशारा पुरंदर गड किल्ले संवर्धन करणाऱ्या इतिहास प्रेमींनी दिला आहे.
शेतकऱ्याकडून 25 हजारांची लाच घेणं भोवलं
राज्यात लाच घेतल्याचे अनेक प्रकरण उघडकीस आले आहेत. अशातचं आता इंदापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंदापूर तहसील कार्यालय येथे महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या कावेरी विजय खाडे यांना शेतकऱ्याकडून २५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. तसेचं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.