Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापुरात जप्त केलेलं वाहन सोडवण्यासाठी केली ‘इतक्या’ रकमेची मागणी; API वर गुन्हा दाखल

लाच लुचपतच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. गांधीनगरचे तत्कालीन एपीआय जाधव यांच्या विरोधात जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे काही तक्रारी दाखल झाल्या होत्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 19, 2024 | 09:17 PM
कोल्हापुरात जप्त केलेलं वाहन सोडवण्यासाठी केली 'इतक्या' रकमेची मागणी; API वर गुन्हा दाखल

कोल्हापुरात जप्त केलेलं वाहन सोडवण्यासाठी केली 'इतक्या' रकमेची मागणी; API वर गुन्हा दाखल

Follow Us
Close
Follow Us:

काेल्हापूर/इचलकरंजी:  गुन्ह्यात जप्त केलेली आयशर टेम्पो  सोडविण्यासह न्यायालयातील खटल्यात मदत करण्यासाठी ५० हजारांची मागणी केल्याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्याचे तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्यासह तिघांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाचाही समावेश आहे.

दरम्यान ,लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने या प्रकरणी जाधवसह दोघांना ताब्यात घेतले आहे. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक दीपक शंकर जाधव (वय ४४, रा. बापट कॅम्प) याच्यासह उपनिरीक्षक आबासाहेब तुकाराम शिरगिरे (रा. निगडेवाडी, उचगाव, ता. करवीर) आणि कॉन्स्टेबल संतोष बळीराम कांबळे (वय ३३, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) हे तिघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले.

गुन्ह्यात जप्त केलेला आयशर टेम्पो परत देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. एपीआय जाधव आणि कॉन्स्टेबल कांबळे यांना पथकाने ताब्यात घेतले. तर पीएसआय शिरगिरे पळून गेला. गुरुवारी दुपारीच गांधीनगर पोलिस ठाण्यात ही कारवाई झाली. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव याने गेल्या महिन्यात जनावरांची अवैध वाहतूक करणा-या संशयितांवर कारवाई केली होती. त्या गुन्ह्यात जप्त केलेला आयशर टेम्पो परत देण्यासाठी त्यांनी टेम्पो मालकाकडे लाचेची मागणी केली होती.

हेही वाचा:  सांगलीत महिला पोलिस हवालदार लाचेच्या जाळ्यात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

टेम्पो परत मिळावी यासाठी तक्रारदार गांधीनगर पोलिस ठाण्यात वारंवार  चकरा मारत होता. त्याच्याकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करून जाधव आणि कांबळे या दोघांना ताब्यात घेतले. तर कारवाईची चाहूल लागताच उपनिरीक्षक शिरगिरे पळून गेला. पोलीस ठाण्यातच झालेल्या या कारवाईने कोल्हापूर  पोलिस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सात डिसेंबरला दिलीप जाधव यांची गांधीनगर पोलीस ठाण्यातून तडकाफडकी कोल्हापूर नियंत्रण कक्षाकडे बदली केली होती.

लाच लुचपतच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. गांधीनगरचे तत्कालीन एपीआय जाधव यांच्या विरोधात जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे काही तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्या  अनुषंगाने त्यांची चौकशी सुरू असल्याचे समजते.त्यानंतरच त्यांची नियंत्रण कक्षाकडे बदली करण्यात आली होती बदलीनंतरही जाधव गांधीनगर पोलीस ठाण्यात जात असल्याचेही समजते , आज त्याच पोलीस ठाण्यात त्यांना पकडण्यात आले.

सांगलीत महिला पोलिस हवालदार लाचेच्या जाळ्यात

सांगलीमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. महिला पोलीस लाच घेताना हाती आले आहे. सांगलीमध्ये पोलिसांना रंगेहात पकडले आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेताना विश्रामबाग पोलिस ठाण्यातील महिला हवालदार यांना पकडले आहे. अटक करण्यात आलेल्या महिला पोलीस हवालदाराचे नाव मनिषा नितीन कोंगनोळीकर उर्फ भडेकर (वय ४२, रा. शारदानगर, सांगली) असे आहे. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.

Web Title: Crime against three including api for demanding bribe of rs fifty thousand gandhinagar ichalkaranji kolhapur crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 09:17 PM

Topics:  

  • Bribe Case
  • Kolhapur Crime

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.