
Highway Accident: "मदतीचा हात ठरला काळ!" रस्त्यात रडणाऱ्या महिलेला धीर देण्यासाठी थांबलेल्या तरुणाचा भरधाव टेम्पोच्या धडकेत...
नेर्ली-तामगाव येथील एक कुटुंब शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास चारचाकी वाहनाने गणपतीपुळ्याला जात होते. कोतोली फाट्या जवळ आल्यावर गाडीतील एका मुलाची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले आणि मुलाला उपचारासाठी कर्ले येथील दवाखान्यात नेले. याच वेळी नेहमीप्रमाणे पहाटे फिरायला गेलेले रमेश थोरात तिथे आले. गाडीत एक महिला रडत असल्याचे पाहून त्यांनी तत्परतेने विचारपूस केली आणि अपघात टाळण्यासाठी ती चारचाकी रस्त्याच्या कडेला घेण्यास मदत केली. मात्र, थोरात हे चारचाकीतून खाली उतरत असतानाच कोल्हापूरहून पन्हाळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की रमेश थोरात हे सुमारे ५० फूट लांब उडून रस्त्यावर आदळले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत रमेश थोरात यांच्या मागे पत्नी, आई, बहीण आणि तीन मुले असा परिवार असून, ते कुटुंबातील एकमेव कर्ते पुरुष होते.
अपघातानंतर टेम्पोचालक निखिल बंडू तराळ (रा. मौजे वडगाव) हा घटनास्थळावरून पळून गेला. मात्र, वाघबीळ घाटातील नलवडे बंगल्याजवळ त्याचा टेम्पो अनियंत्रित होऊन उलटला. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने धाव घेऊन पळून जाणाऱ्या चालकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, मदतीसाठी धावलेल्या निष्पाप व्यक्तीच्या मृत्यूने आसुर्ले परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.
Ans: अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव रमेश भीमराव थोरात (वय ४१, रा. आसुर्ले, ता. पन्हाळा) असे आहे.
Ans: हा अपघात कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील कोतोली फाट्याजवळ घडला.
Ans: अपघातानंतर पळून जाणाऱ्या टेम्पोचालकाचा टेम्पो वाघबीळ घाटात उलटल्यानंतर महामार्ग पोलिसांनी त्याला तेथेच ताब्यात घेतले.