Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भयमुक्त पुणे की गुन्हेगारांचा अड्डा! दिवसाढवळ्या चैन स्नॅचिंग; रात्री घरफोड्या अन् लुटमार

गँगवार अन् टोळ्यांच्या गुन्ह्यांनी शहर रक्तरंजित होत असताना दुसरीकडे स्ट्रीट क्राईमने सर्व सामान्य नागरिकांची "सुरक्षितता" धोक्यात आणली आहे. रस्त्यावरील गुन्ह्यांमुळे भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 03, 2025 | 11:26 AM
भयमुक्त पुणे की गुन्हेगारांचा अड्डा! दिवसाढवळ्या चैन स्नॅचिंग; रात्री घरफोड्या अन् लुटमार

भयमुक्त पुणे की गुन्हेगारांचा अड्डा! दिवसाढवळ्या चैन स्नॅचिंग; रात्री घरफोड्या अन् लुटमार

Follow Us
Close
Follow Us:
  • भयमुक्त पुणे की गुन्हेगारांचा अड्डा
  • दिवसाढवळ्या चैन स्नॅचिंग
  • स्ट्रीट क्राईममुळे असुरक्षितता

पुणे/अक्षय फाटक : गँगवार अन् टोळ्यांच्या गुन्ह्यांनी शहर रक्तरंजित होत असताना दुसरीकडे स्ट्रीट क्राईमने सर्व सामान्य नागरिकांची “सुरक्षितता” धोक्यात आणली आहे. रस्त्यावरील गुन्ह्यांमुळे भीतीच वातावरण निर्माण झालं असून, चैन स्नॅचिंग, मोबाईल लुटमारी तसेच घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांमुळे “भयमुक्त पुणे की गुन्हेगारांचा अड्डा” आहे अशी म्हणण्याची वेळ आली आहे. पोलिस गस्त असूनही गुन्हेगारांना अजिबात भीती उरलेली नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळेच सामान्य नागरिक “पोलिस आयुक्त साहेब, इकडेही लक्ष द्या ! असे म्हणत धुमाकूळ घालणाऱ्या या गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी नम्रविनंती करू लागले आहेत.

पुणे शहरात अवघ्या पंधरवड्यात कोथरूड, बाणेर, विमाननगर, कात्रज, कोंढवा आणि इतर शहरात तब्बल वीसहून अधिक चैन स्नॅचिंग आणि चोरीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. अगदी न कळत हे चोरटे “स्लो” मेशनमध्ये महिलांच्या जवळ येत त्यांच्या गळ्यातील सोन साखळी जबरदस्तीने हिसकावून गाडीचा वेग सुसाट ठेवत क्षणताच पोबारा करतात. महिला व नागरिक अचानक झालेल्या या हल्याने घाबरलेले असतात. काहींनी पाठलाग केला तरी ते सापडत नाहीत. काही वर्षांपुर्वी पुण्यात अशाच पद्धतीने टोळ्या सक्रिय झालेल्या होत्या. त्यानंतर या टोळ्यांना पायबंद घालण्यात यश आलेले होते. परंतु, पुन्हा या टोळ्या गेल्या काही महिन्यांपासून अॅक्टीव्ह झाल्याचे दिसत आहे.

धक्कादायक म्हणजे, अनेक घटनांमध्ये सीसीटीव्हीत आरोपी कैद झाले असले तरी त्यांचा मागोवा लागलेला नाही. पोलिस गस्त व पेट्रोलिंग अशा अनेक गोष्टी सुरू असताना देखील पोलिसांना गुन्हेगार सापडत नाहीत. अनेक महिन्यांपासून धुमाकूळ सुरू असताना पोलिस मात्र, टोळ्यांमध्येच अन् गाजलेल्या प्रकरणांत गुंतले गेल्याचेही एक कटू वास्तव आहे. एक घटना घडल्यानंतर पुर्ण गुन्हे शाखा अन् स्थानिक पोलिस त्याच्या मागावर असतात. त्याचाच फायदा बहुदा हे स्ट्रीट क्राईमवाले गुन्हेगारांना मिळत असावा. चैन स्नॅचिंग, मोबाईल लुटमार व घरफोड्यांच्या गुन्हेगारांकडे लक्षच देत नाही, हेच सत्य गेल्या काही महिन्यांपासून पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात पुन्हा टोळी युद्ध पेटलं; बदला घेत गणेश काळेची गोळ्या झाडून निर्घृण हत्या, आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल

गुन्हे शाखा फक्त वाहन चोर अन् तुटपळ गुन्हेगारांकडे

गुन्हे शाखेकडून शहरातील टोळ्यांवर विशेष लक्ष असले तरी इतर गुन्हेगारांकडे साफ दुर्लक्ष असल्याचेच दिसत आहे. गुन्हे शाखेची पथके एखाद दुसरा तडीपार, किंवा मोबाईल चोरटा, घरफोडीतला गुन्हेगार पकडला जात आहे. पण, चमकादर कामगारी गेल्या काही वर्षांपासून झालेलीच नसल्याचे दिसते.

पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या तक्रारींवर “तपास सुरू आहे” एवढेच उत्तर मिळते, पण प्रत्यक्षात गुन्हेगार मोकाट आहेत. गँगवॉरकडे पोलिसांचे अधिक लक्ष असल्याने सामान्य चोरीच्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन असुरक्षित बनले आहे.

चेन स्नॅचिंग गुन्हे उघड गुन्हे
सप्टेंबर २०२५ १२८ गुन्हे ६८ उघड
सप्टेंबर २०२४ ८५ गुन्हे ५० उघड

 

Web Title: Crime and theft incidents have increased in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 11:26 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

pune crime: एसीबीची मोठी कारवाई! पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेतील PSI 46.50 लाखांची लाच घेताना अटक
1

pune crime: एसीबीची मोठी कारवाई! पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेतील PSI 46.50 लाखांची लाच घेताना अटक

Pune Crime: दहशतवादी हल्ल्याचं भय दाखवून फसवणूक; कोथरूडमधील महिलेची ५१ लाखांची लूट, सायबर पोलिसांकडे तक्रार
2

Pune Crime: दहशतवादी हल्ल्याचं भय दाखवून फसवणूक; कोथरूडमधील महिलेची ५१ लाखांची लूट, सायबर पोलिसांकडे तक्रार

तुम्हाला डिजिटल अरेस्ट झाली! अहिल्यानगरच्या अभियंत्याला घातला 9 लाखांचा गंडा
3

तुम्हाला डिजिटल अरेस्ट झाली! अहिल्यानगरच्या अभियंत्याला घातला 9 लाखांचा गंडा

हिंजवडी परिसरात 18 वर्षीय मुलीवर चॉपरने हल्ला; धक्कादायक कारणही समोर
4

हिंजवडी परिसरात 18 वर्षीय मुलीवर चॉपरने हल्ला; धक्कादायक कारणही समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.