
कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा
पोलिसांकडून अधिक तपास सुरू
कणकवलीमधील प्रकार
कणकवली: दारिस्ते गावातील गुरवाडी येथे एका व्यक्तीने विक्रीसाठी १२ गुरे आणून आपल्या शेतजमीनीमध्ये बांधून ठेवली आहेत, अशी तक्रार बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद संस्थेकडून पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिस पाटील यांच्या पाहणीमध्ये ही गुरे आढळूने आल्याने गुरे आणून बांधून ठेवणाया वासुदेव गुरव (वय २९, रा.दारिस्ते गुरववाडी) याच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारिस्ते गुरववाडी येथे एका व्यक्त्तीने विक्रीसाठी पाळीव जनावरे आणली असल्याची तक्रार बजरंग दल आणि विश्वहिंदू परिषदेच्या कार्यकत्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर कणकवली पोलिस निरीक्षकानी गावचे पोलिस पाटील हेमत सावत (रा. दारिस्ते) यानी गावात जाऊन वस्तुस्थिती पाहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सावंत यांनी दारिस्ते गुरववाडी येथील वासुदेव भरत गुरव याच्या शेत जमिनीमध्ये जाऊन पहिले असता गाय, बैल आणि वासरू अशी १२ जनावरे आढळून आली. या सर्वांची किंमत ९८ हजार ५०० रुपये आहे.
दारिस्ते येथे जनावरे आणल्यानंतर वासुदेव गुरव दांनी या जनावरांना वाव पाण्याची तरतूद अपुरी केलेली आहे, त्यांना बांधून ठेवण्यात आलेले आहे. तसंच विक्रीच्या उद्देशाने ही जनावरे आणलेली आहेत, असा अहवाल पोलिस पाटील हेमंत सावंत यानी कणकवली पोलिस ठाण्यात दिला. त्यानुसार दारिस्ते येथील वासुदेव भरत भगत वाध्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम १९ (१) या (फ), (ह) आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास हवालदार सुनील वेंगुर्लेकर करत आहेत.
व्यावसायिकाला ३६ लाखांचा गंडा
फेसबुक वर झालेली महिलेची ओळख एका व्यावसायिकाला महागात पडली आहे. क्रिप्टोक्रम करन्सीच्या माध्यमातून लाखो रुपये मिळविण्य मिळविण्याचे प्रलोभन दाखवत या भामट्या महिलेने या व्यावसायिकाला ३६ लाख ६५ हजार रुपयांना ऑनलाइन चुना लावला आहे. फसवणुकीची ही घटना 4 जानेवारी २०२६ ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मिरजोळे एमआयडीसी रत्नागिरी येथील गांधी फॅब्रिकेटर्स या फिर्यादीच्या दुकानात घडली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यावसायिकाने सुहानी शर्मा आणि डॅनियल या दोघांविरोधात रत्नागिरी सायबर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Cyber Crime: व्यावसायिकाला ३६ लाखांचा गंडा; एका लिंकवर क्लिक करणे पडले महागात
पोलिसात दिलेल्या फिर्यादीमध्ये या व्यावसायिक फिर्यादीने म्हटले आहे की फेसबुक या समाज माध्यमावर सुहानी शर्मा या महिलेशी त्यांची ओळख झाली होती. त्या महिलेने या व्यावसायिकाचा विश्वास संपादन करून आपला मित्र डॅनियल हा क्रिप्टो करन्सी मार्केटच्या ट्रस्टीन कॉइन या वेब एप्लीकेशनचा सीनियर अकाउंटंट मॅनेजर असल्याचे फिर्यादीला भासवले.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.