Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डॉक्टरसह १० वैद्यकीय विद्यार्थ्यांना गांजाची विक्री केल्याप्रकरणी अटक, पुरवत होता परदेशी नागरिक, अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता

कर्नाटकातील मंगळुरू येथे भारतीय वंशाचा परदेशी नागरिक, डॉक्टर, एमबीबीएस आणि दंतवैद्यकीय विद्यार्थ्यांसह दहा जणांना गांजा पिणे तसेच विक्री केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यापैकी दोन डॉक्टर आहेत. शहरातील तीन व्यावसायिक महाविद्यालयातील सात वैद्यकीय/दंत विद्यार्थी आहेत, जे वेगवेगळ्या राज्यातील आहेत.

  • By Vivek Bhor
Updated On: Jan 12, 2023 | 10:41 PM
डॉक्टरसह १० वैद्यकीय विद्यार्थ्यांना गांजाची विक्री केल्याप्रकरणी अटक, पुरवत होता परदेशी नागरिक, अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता
Follow Us
Close
Follow Us:

कर्नाटकातील (Karnataka) मंगळुरू पोलिसांनी (Mengluru Police) अंमली पदार्थांच्या तस्करीचे (Drugs Peddling) मोठे रॅकेट उघड केले आहे. येथे भारतीय वंशाचा परदेशी नागरिक (A foreign national of Indian origin) एमबीबीएस डॉक्टरांसह वैद्यकीय विद्यार्थ्यांना गांजाचा पुरवठा करत असे. हा तरुण डेंटल कॉलेजमध्ये शिकत आहे. या संपूर्ण टोळीतील १० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे कनेक्शन तपासले जात आहे. आरोपी गांजा व्यतिरिक्त इतर अंमली पदार्थांचा पुरवठा करत असे का, याचा शोध घेत आहोत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी बुधवारी सांगितले की त्यांनी नील किशोरीलाल रामजी शॉ (३८) या भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकाला गेल्या आठवड्यात त्याच्या फ्लॅटमध्ये गांजा विकल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. चौकशी केली असता त्याने इतर सहकाऱ्यांनाही पुरवठा केल्याची माहिती दिली. रामजी शा हे गेल्या १५ वर्षांपासून मंगळुरू येथे राहत असून शहरातील दंत महाविद्यालयात चौथ्या वर्षाचे विद्यार्थी आहेत. चौकशीदरम्यान, शॉने इतर वैद्यकीय, दंत महाविद्यालयातील विद्यार्थी आणि गांजाची विक्री आणि पुरवठा करणाऱ्या डॉक्टरांची माहिती दिली. या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, त्यांच्याकडून ५०,००० रुपये किमतीचा दोन किलो गांजा, दोन मोबाईल फोन, एक बनावट पिस्तूल, एक खंजीर, ७,००० रुपये रोख, एक डिजिटल वजनाचे यंत्र आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

[read_also content=”‘पतली कमरिया मोरी’ गाण्यावर महिला शिक्षिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर करतोय कल्ला, मुलांनी असं केलं स्वागत; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/viral/video-of-female-teacher-on-song-patli-kamariya-mori-goes-viral-social-media-children-welcome-like-this-nrvb-361267.html”]

अन्य ९ आरोपींमध्ये दोन डॉक्टर आहेत. शहरातील तीन व्यावसायिक महाविद्यालयांतील सात वैद्यकीय/दंतवैद्यकीय विद्यार्थी आहेत, जे वेगवेगळ्या राज्यातील आहेत. यामध्ये चार मुलींचाही समावेश आहे. या सर्वांना वसतिगृह, पीजी आणि खासगी निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून भांग आणि ९ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

[read_also content=”ऑनलाइनच त्याच्यावर भाळली, दोन लेकरांना दिलं सोडून; अखेर त्यानेच वाऱ्यावर सोडलं; वाचा दर्दभरी प्रेमकथा https://www.navarashtra.com/crime/love-lagna-lochya-samastipur-mother-of-two-children-falls-in-love-on-facebook-lover-ran-away-leaving-her-at-the-railway-station-nrvb-361250.html”]

हे लोक सिंथेटिक ड्रग्सचे सेवन आणि तस्करी करत होते का, याचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींना आज स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Crime ganja consumption peddling doctors medical students among 10 arrested in mangaluru nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2023 | 10:41 PM

Topics:  

  • medical students

संबंधित बातम्या

अभ्यासात सातत्य आणि एकाग्रता वाढवण्यासाठी उपयुक्त टिप्स! कराल फॉलो तर, घडवाल भवितव्य
1

अभ्यासात सातत्य आणि एकाग्रता वाढवण्यासाठी उपयुक्त टिप्स! कराल फॉलो तर, घडवाल भवितव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.