बीड:बीडमध्ये दहशत माजवणारा सतीश भोसले उर्फ ‘खोका’ याला वन विभागाच्या कोठडीत मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी वन विभागाने त्याला ताब्यात घेतले होते, त्यानंतर त्याला कोठडीत ठेवण्यात आले. या दरम्यान त्याच्यावर मारहाण करण्यात आल्याचे बोलले जात आहे. भोसलेच्या पाठीवर मारहाणीचे वळ स्पष्ट दिसणारे काही फोटो सध्या समोर आले असून, ते सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये ढाकणे पिता-पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सतीश भोसले उर्फ ‘खोका’ याला वन विभागाच्या कोठडीत मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. या मारहाणीचा दावा खुद्द खोक्याच्या वकिलाने केला आहे. यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. या प्रकारामुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. मारहाण झाल्याचे काही फोटोही व्हायरल झाले असून, त्यात खोक्याच्या पाठीवर मारहाणीचे स्पष्ट वळ दिसून येतात. सदर घटनेनंतर सतीश भोसलेला पुन्हा न्यायालयीन कोठडीत हलवण्यात आले आहे.
Waqf Amendment Bill : लोकसभेनंतर आता राज्यसभेतही विधेयक मंजूर; विधेयकाच्या बाजूने 128 मते
सतीश उर्फ ‘खोका’ भोसले यांच्या राहत्या घरी वन विभागाने केलेल्या कारवाईत वन्य प्राणी पकडण्यासाठी वापरली जाणारी जाळी, शिकारसाठीची हत्यारे तसेच वन्य प्राण्यांचे मांस आढळून आले. या प्रकरणी भोसले आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात वन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी दुपारी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या भोसलेला वन विभागाने ताब्यात घेतले आणि विभागाच्या कोठडीत ठेवले. त्याच कोठडीत त्याच्यावर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला असून, संबंधित घटनेचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकारामुळे प्रकरण अधिकच गाजू लागले आहे.
खोक्याला वन विभागाच्या कोठडीत कोणी मारहाण केली? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ,सतीश भोसलेला मारहाण झाल्यानंतर त्याच्या वकिलाने त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. वकिलाची ही मागणी मान्य करण्यात आली त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
खोक्याला नेमकी कोठडीत कोणी मारलं?
खोक्याला वन विभागाच्या कोठडीत कोणी आणि का मारहाण केली? हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात असून, या प्रकरणावर अनेक तर्क-वितर्क सुरू आहेत. मारहाण झाल्यानंतर सतीश भोसलेच्या वकिलाने न्यायालयात त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. वकिलाची ही मागणी मान्य करत न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.