Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: तीन महिने माहेरी होती अश्विनी; तरीही फोनवरून होत होता कथित मानसिक छळ? वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं

राष्ट्रीय स्तरावर कुस्तीच्या मैदानात नाव कमावलेल्या अश्विनी पौळ यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलांनी केलेल्या आरोपांनी या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. तीन महिन्यांपासून माहेरी राहत असतानाही अश्विनीला फोनवरून धमक्या आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा दावा त्यांच्या वडिलांनी केला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 04, 2026 | 03:17 PM
Crime News: तीन महिने माहेरी होती अश्विनी; तरीही फोनवरून होत होता कथित मानसिक छळ? वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं

Crime News: तीन महिने माहेरी होती अश्विनी; तरीही फोनवरून होत होता कथित मानसिक छळ? वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं

Follow Us
Follow Us:
  • फोनवरून टॉर्चर केलं जायचं असा वडिलांचा गंभीर आरोप
  • तुला जगू देणार नाही अशी धमकी? असा आरोप
  • कुस्तीपटू अश्विनीच्या वडिलांचा धक्कादायक दावा
Dharashiv Crime News: नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यावर तीन मुलांसह घडलेल्या धक्कादायक घटनेत कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ यांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. अश्विनी यांच्या वडिलांनी त्यांच्या पतीसह सासू आणि सासऱ्यांवर मानसिक छळ आणि धमक्यांचे गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आली असून, तपास सुरू आहे.

अश्विनींसह दोन मुलांचा मृत्यू
अश्विनी पौळ या निलंगा तालुक्यातील पौळ आंबुलगा येथील रहिवासी होत्या. गुरुवारी दुपारी त्या नळदुर्ग किल्ल्यातील उपळी बुरुज परिसरात तीन मुलांसह गेल्या होत्या. त्यानंतर घडलेल्या घटनेत अश्विनी आणि त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला, तर एका मुलीवर उपचार सुरू आहेत.

५ सुवर्ण,६ रौप्य पदकांची मानकरी…‘महाराष्ट्राची वाघीण’म्हणून ओळख; अश्विनीने तीन मुलांसह उचलले टोकाचे पाऊल

सासरच्या जाचाला घेतलं कंटाळून टोकाचे पाऊल
या घटनेनंतर अश्विनी यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी त्यांच्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले. अश्विनी यांचे वडील तानाजी मोहिते यांनी पती, सासू आणि सासरे यांच्या कथित जाचाला कंटाळून मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे.

तीन महिने माहेरी होती तरीही फोनवरून त्रास
मोहिते यांच्या म्हणण्यानुसार, अश्विनीला सासरच्या मंडळींकडून वारंवार फोन केले जात होते. फोनवरून तिच्यावर मानसिक दबाव आणला जात होता, तसेच धमक्याही दिल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला. विशेष म्हणजे, अश्विनी मागील तीन महिन्यांपासून माहेरी राहत होती. मात्र, माहेरी आल्यानंतरही फोनवरून तिच्याशी संपर्क साधून कथित त्रास दिला जात होता, असे वडिलांनी सांगितले.

मागील आठ दिवसांत नेमकं काय घडलं? वडिलांचा संशय
मागील आठ दिवसांत अश्विनीशी काहीतरी बोलले गेले असावे, ज्यामुळे ती मानसिक तणावाखाली गेली असावी, असा संशयही वडिलांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Crime News: नवी मुंबईतील कामोठे परिसरात संतापजनक घटना; सर्व विद्यार्थी उतरल्यावर चिमुकली बसमध्ये एकटी राहिल्याचा घेतला गैरफायदा

वडिलांनीच दिले कुस्तीचे धडे

अश्विनी पौळ यांच्या कुस्तीच्या प्रवासात त्यांचे वडील तानाजी मोहिते यांचा मोठा वाटा होता. शिक्षक असलेल्या मोहिते यांनी मुलीची कुस्तीतील आवड लक्षात घेऊन तिच्या सरावासाठी घराजवळच व्यवस्था केली होती. लहानपणापासून त्यांनी अश्विनीला कुस्तीचे प्रशिक्षण दिले. राष्ट्रीय स्तरावर कुस्तीमध्ये नाव कमावलेल्या अश्विनी यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांसह क्रीडा क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, वडिलांनी केलेले मानसिक छळ आणि धमक्यांचे आरोप गंभीर आहेत. या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, तसेच या प्रकरणात नेमकी काय पार्श्वभूमी होती, हे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होणार आहे. एफआयआरनंतर पोलिसांकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Crime news ashwini had been staying at her parents home for three months yet was she still being subjected to mental harassment over the phone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 03:17 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.