फोटो सौजन्य - सोशल मडीया
वडिलांचा सासरच्यांवर गंभीर आरोप
अश्विनी यांच्या वडिलांनी पती आणि सासरच्या मंडळींकडून मानसिक तसेच शारीरिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या त्रासाला कंटाळूनच अश्विनी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा त्यांच्या वडिलांनी केला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, पोलिसांकडून त्याबाबत चौकशी सुरू आहे. या घटनेत अडीच वर्षांची वीरा ही मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा: कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; गळ्यावर व पोटावर बेदम मारहाण, मणक्याचे हाड तुटले…
पाच महिन्यांपूर्वी नोकरीचा राजीनामा
अश्विनी पौळ मुंबईतील ‘एमएसएफ’मध्ये नोकरी करत होत्या. त्यांचे पती मनोहर पौळ हे रिक्षाचालक असल्याची माहिती आहे. पतीच्या सांगण्यावरून अश्विनी यांनी चार ते पाच महिन्यांपूर्वी नोकरीचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. मागील तीन महिन्यांपासून त्या आपल्या तीन मुलांसह माहेरी राहत होत्या. तसेच नळदुर्ग किल्ल्यावर नेमके काय घडले, अश्विनी यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले आणि त्यामागे कौटुंबिक कारणे होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. कुटुंबीयांचे जबाब, उपलब्ध पुरावे आणि अन्य परिस्थितीजन्य बाबींच्या आधारे या प्रकरणाचा तपास पुढे नेला जात आहे.






