Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Fraud: सायबर चोरट्यांनी 7 जणांना हेरले, अन् थेट 70 लाखांना…; कराडमधील घटना

Crime News: काले- गांधीनगर येथील अल्लाउद्दीन तांबोळी आणि त्यांचे मित्र श्यामसुंदर सारडा या दोघांची आगाशिवनगर येथील प्रमोद पाटील याच्याशी ओळख झाली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 17, 2024 | 06:46 PM
ऑनलाईन पार्सलच्या नावाखाली महिलेची फसवणूक; परस्परच कर्ज काढलं अन् नंतर...

ऑनलाईन पार्सलच्या नावाखाली महिलेची फसवणूक; परस्परच कर्ज काढलं अन् नंतर...

Follow Us
Close
Follow Us:
कराड: तालुक्यातील सात जणांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची ७० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत अल्लाउद्दीन गुलाब तांबोळी (रा. गांधीनगर-काले, ता. कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रमोद रमेश पाटील (रा. पंचरत्न अपार्टमेंट, आगाशिवनगर-मलकापूर, कराड) याच्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काले- गांधीनगर येथील अल्लाउद्दीन तांबोळी आणि त्यांचे मित्र श्यामसुंदर सारडा या दोघांची आगाशिवनगर येथील प्रमोद पाटील याच्याशी ओळख झाली होती. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून दिवसाला लाखो रुपये कमवत असल्याचे प्रमोद पाटील याने त्या दोघांना सांगितले. तसेच त्यांनाही गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्या गुंतवणुकीची विश्वसार्हता म्हणून त्याच रकमेचे धनादेश आणि नोटरी करुन देण्याचेही प्रमोद पाटील याने कबूल केले.

त्यानुसार अल्लाउद्दीन तांबोळी यांनी मार्च २०२२ मध्ये १० लाख ५० हजार रुपये, तर त्यांचे मित्र श्यामसुंदर सारडा यांनी २१ लाख रुपये प्रमोद पाटील याला दिले. मात्र, २०२२ पासून २०२४ पर्यंत प्रमोद पाटील याने दोघांनाही मूळ रक्कम अथवा त्याचा परतावा दिला नाही. त्यामुळे अल्लाउद्दीन तांबोळी आणि श्यामसुंदर सारडा यांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. वारंवार पैशाची मागणी करूनही प्रमोद पाटील याने त्यांना टाळले. तसेच शेअर मार्केट पडले आहे. थोड्या दिवसांनी पैसे देतो, असे सांगून त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली.

अल्लाउद्दीन तांबोळी, श्यामसुंदर सारडा यांच्यासह अन्य पाच जणांकडून प्रमोद पाटील याने दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून पैसे घेतल्याचे, तसेच सर्वांची मिळून सुमारे ७० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर अल्लाउद्दीन तांबोळी यांनी याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्लाउद्दीन तांबोळी आणि श्यामसुंदर सारडा यांच्यासह प्रमोद पाटील याने हिना चेतन मोठा यांचे ३ लाख, जयकर जयसिंग पाटील यांचे ३ लाख, डॉ. नितीन नरेंद्रकुमार जाधव यांचे १० लाख, गणेश पाटील यांचे १० लाख, राजाराम पांडुरंग माने यांचे १५ लाख ५० हजार असे एकूण ७० लाख ५० हजार रुपये घेतले असल्याचे अल्लाउद्दीन तांबोळी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाण तपास करीत आहेत.

हेही वाचा: Cyber Crime: पोलीस कारवाईची भीती दाखवली अन् चोरट्यांनी तरुणाला तब्बल…

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने २९ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत महिलेसह दोघांची २९ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाषाण भागातील महिलेची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी १९ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केली.

Web Title: Cyber crime with 7 persons about rs 70 lakhs karad online fraud share marker crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 06:46 PM

Topics:  

  • cyber crime

संबंधित बातम्या

सोशल मिडीयावरील ओळख महिलांना पडली महागात; सायबर चोरट्यांकडून तब्बल 13 लाखांची फसवणूक
1

सोशल मिडीयावरील ओळख महिलांना पडली महागात; सायबर चोरट्यांकडून तब्बल 13 लाखांची फसवणूक

Cyber Attack: जगभरातील 9000 विद्यापीठांवर सायबर अटॅक; विद्यार्थ्यांच्या कॉम्प्युटरवर हॅकर्सनी पाठवला ‘असा’ संदेश, इंटरनेटवर वादळ
2

Cyber Attack: जगभरातील 9000 विद्यापीठांवर सायबर अटॅक; विद्यार्थ्यांच्या कॉम्प्युटरवर हॅकर्सनी पाठवला ‘असा’ संदेश, इंटरनेटवर वादळ

फसवणुकीतील रक्कम अमेरिकेतून परत मिळवली, पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांचे यश; उद्योजकाला मिळाले तब्बल…
3

फसवणुकीतील रक्कम अमेरिकेतून परत मिळवली, पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांचे यश; उद्योजकाला मिळाले तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.