Mulshi Crime News: वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणाला काही दिवस उलटत नाहीत तोच हगवणे कुटुंबियांशी संबंधित असलेल्या आणखी एका कुटुंबातून अशाच प्रकरचे आणखी काही प्रकरण समोर आले आहे. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पळून जाण्यासाठी चौंधे कुटुंबियांनी थार गाडी दिली होती. याच चौंधे कुटुंबाचा प्रताप समोर आला आहे.
चौंधे कुटुंबातील सुनेनेही २० लाखांच्या हुंड्यांसाठी आपला छळ केला जात असल्याची तक्रार जानेवारी महिन्यात खडकी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात राज्य महिला आयोगाकडेही तक्रार दिली होती. पण महिला आयोगने त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. या महिलेच्या तक्रारीनंतर हगवणे कुटुंबियांशी संबंधित प्रत्येक व्यक्ती त्यांच्या घरातील सुनांचा छळ करतो की काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
सुयश चौंधे यांच्या पत्नी धनश्री चौंधे यांनी तक्रार केली आहे. नवरा सुयश चौंधे, दीर संकेत चोंधे, सासरा नरेश चौंधे, सासू वैशाली चौंधे हे सर्व २० लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आपला शारिरीक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप सुयश चौंधे यांच्या पत्नाने केला आहे. आपण या सर्वांविरोधात पोलीस आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली होती. पण त्यांनी आपल्या तक्रारीकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले. त्यांच्या त्रासाला कंटाळून आपणही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. असही या महिलेने म्हटलं आहे.
चौंधे कुटुंबातील सुनेने सासूवरही सासू जादू-टोणा करत असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. लग्नाच्या वेळी माहेरच्यांनी दोन लाख रुपये हुंडा आणि दोन तोळे सोनंही दिलं होतं. पण लग्नानंतर वारंवार सासरच्यांकडून पैशांची मागणी सुरूच होती. त्यातून अनेकदा आपल्याला मारहाणही केली जाते. असंही या महिलेने म्हटले आहे. धक्कादायक म्हणजे संबंधित महिलेने नवरा सुयश चौंधे याच्यावरही आरोप केले आहेत. नवरा सुयश चौंधे ब्ल्यु फिल्म दाखवून शरीर संबंध ठेवायचा. नवरा आणि दीर दोघेही सासूसमोरच गांजा प्यायचे, असाही आरोप महिलेने केला आहे. तसेच आपल्याला आणि आपल्या मुलीला न्याय द्यावा, अशी मागणीही तिने केली आहे.
दारूड्या पतीच्या सततच्या त्रासाला पत्नी कंटाळली; अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन पतीचा काटाच काढला
इतकेच नव्हे तर मानसिक आणि शारिरीक त्रास तर सुरुच आहे. पण हुंडयासाठी घरात सातत्याने वाद-भांडणे व्हायचे. दोघेही भाऊ दिवसभर दारू प्यायचे, मुलींना घेऊन फिरायचे, हेच त्यांचं रूटीन आहे. शीतल उभे नावाची एक महिला मुळशीतील पोरांना मुली पुरवते असा धक्कादायक खुलासाही धनश्री चौंधे यांनी केला आहे. शीतल उभे पोरांना मोबाईवर मुलींचे फोटो पाठवते, मी मोबाईलमध्ये पाहिल्यानंतर त्याचे स्क्रिनशॉट काढून ठेवले आहेत. सुयशची आई वैशाली आई गावची उपसरपंच होत्या. त्यांनीही आधी निवडणुका लढल्या आहेत.