JEWELRY(फोटो सौजन्य- SOCIAL MEDIA)
घरात दुपारच्या सुमारास बँकेत पैसे काढण्यासाठी जाते, असे सुनेने सांगितले. सून घरातून तिच्या मित्रासह निघून गेली. त्यानंतर आपण घरातील कपाट तपासले असता तिजोरीतील ७ लाख ९१ हजार ७०९ रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे दिसून आले.
कुख्यात गुंडानी वाढदिवस ८ गुन्ह्यांची कलमे लिहिलेला केक कापून केला साजरा, पुढचं कलम कोणतं?
डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगरमध्ये राहणाऱ्या एका सासूने आपल्या सुनेसोबत तक्रार दिली आहे. एका सुनेने आपल्याच सासूचे दागिने लांबवले आहे. दागिन्यांची किंमत ७ लाख ९१ हजार रुपये आहे. या प्रकरणात सुनेसोबत तिच्या मित्रावर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगरमध्ये घडली आहे. सून आणि तिचा मित्र फरार असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
सुनेने आपल्या सासूचे दागिने लंबवल्याचा प्रकार घडला आहे. सासूने सुनेवर याबाबत तक्रार केली आहे. या तक्रारीत सुनेने तिच्या मित्रांसोबत घरातील ७ लाख १९ हजार ७०९ रुपयांचे दागिन्यांची चोरी केल्याचा आरोप केला आहे. सासूने दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की तिची वर्षांची सून सातारा जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहे. तिने घरातील दागिने लंपास केले आहे. चोरीस गेलेल्या सोन्याच्या ऐवजांमध्ये दोन मंगळसूत्र, सोन्याच्या बांगड्या, राणी हार, गंठण, सोन्याचे कडे असे एकूण सोन्याचे ११ ऐवज आहेत.
घरात दुपारच्या सुमारास बँकेत पैसे काढण्यासाठी जाते, असे सुनेने सांगितले. सून घरातून तिच्या मित्रासह निघून गेली. त्यानंतर आपण घरातील कपाट तपासले असता तिजोरीतील ७ लाख ९१ हजार ७०९ रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे दिसून आले. सर्वत्र शोध घेतला असता दागिने कुठेही आढळून आले नाहीत. घरात बाहेरून कुणीही आले नाही. घरात चोरी झालेली नाही. त्यामुळे दागिने चोरी होण्याचा प्रश्न येत नसल्याने घरातच हे दागिने चोरीला गेल्याचा संशय व्यक्त करून सासुने हे दागिने आपली सून आणि तिच्या मित्राने चोरल्याचा संशय व्यक्त केला.
या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमिला कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपी महिला आणि तिचा मित्र अद्याप फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिस विविध ठिकाणी तपास करत आहेत.