cake (फोटो सौजन्य- social media)
भांडुपमधील कुख्यात गुंडाने केलेल्या गुन्ह्याची कलमे लिहिलेला केक कापून वाढदिवस साजरा केल्याचे समोर आले आहे. इंस्टाग्रामवर याचे व्हिडीओ देखील वायरल केले आहे.
अनेकदा सोशल मीडियावरून गुन्हेगारी वृत्तीला खतपाणी घालण्याचा काम करण्यात येत. अश्या रिल्स आणि व्हिडीओ वायरल करत हवा करून तरुणाईला आपल्याकडे वाळवतात. गुन्हेगारीचा बादशाह, डॉन, भाई अश्या उपाधी लावतात. आता असाच एक व्हिडीओ भांडुपमधून समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये विशेष हे की या गुंडाने जेवढे गुन्हे केले आहेत, त्याची कलमे लिहिलेला केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. हे व्हिडीओ समोर आल्यांनतर पोलिसांनी कारवाईला सुरवात केली आहे.
भांडुपमध्ये एका कुख्यात गुंडाने केलेल्या गुन्ह्याची कलमे लिहिलेला केक कापून वाढदिवस साजरा केला. झिया अन्सारी असे या गुंडाचे नाव आहे. त्याच्यावर आठ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी तो तुरुंगातून बाहेर आला आहे. दोन दिवसापूर्वीच त्याचा वाढदिवस होता. त्याने अनोखा केक बनवून पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्याच्यावर विविध गुन्ह्यात लागलेल्या कलमांसह पुढील गुन्हा आता काय करणार? अनेकांनी रिल्स आणि सोशल मीडियावर या वाढदिवसाचे फोटो व्हायरल केले आहेत. त्यानंतर, या गुन्हेगारी वाढदिवसांची गंभीर नोंद पोलिसांनी घेतली असून आरोपीला तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
इंस्टाग्रामद्वारे हॉटेल बुकिंगचे आमिष दाखवून फसवणूक
मुंबई, सध्या सोशल मीडियावर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. असाच एक प्रकार गोरेगावमधील एका नागरिकाने हॉटेल बुकिंगसाठी इंस्टाग्रामवर ‘Vivanta Stays’ या पेजवर विश्वास ठेवून ऑनलाईन पेमेंट केलं, मात्र त्यांची तब्बल ५२ हजार रुपयांची फसवणूक झाली. ही घटना १२ फेब्रुवारी ते १० एप्रिल २०२५ दरम्यान घडली. माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत कलम ६६ (क), ६६ (ड) आणि भारतीय न्यायदंड संहितेच्या कलम ३१८ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.