
लेक अचानक गायब झाली अन् नंतर समोर आलं भयंकर सत्य; आईने पोलिसांच्या मदतीने थेट...; कल्याणमधील थरारक प्रकार
Palghar Crime: प्रियकराच्या घरी गेली अन् परतलीच नाही! १७ वर्षीय मुलीच्या कुटुंबीयांचा घातपाताचा संशय
बेपत्ता मुलीने केले धाडसी कृत्य
त्या बेपत्ता झालेल्या मुलीने धाडस दाखवले आणि मोबाईलच्या माध्यमातून आपल्या आईशी संपर्क साधला. ज्यात तिने सांगितले की, एका तरुणाने आपल्याला जबरदस्तीने द्वारली येथील एका बंद घरात डांबून ठेवले आहे, त्यानंतर मी कशीतरी त्या घराच्या खिडकीतून बाहेर पडून एका इमारतीखाली लपल्याचे सांगत आपल्या आईकडे मदत मागितली.
Jalgaon Accident news: काळीज पिळवटून टाकणारी घटना; एकाच कुटुंबातील चौघांनी उचलले टोकाचे पाऊल
लाईव्ह लोकेशन ठरले जीवनदान
आपल्या मुलीचा हा मेसेज आणि तिची घाबरलेली अवस्था समजताच आईने तातडीने तिला लाईव्ह लोकेशन पाठविण्यास सांगितले. त्यानंतर आईने कोणताही वेळ वाया न घालवता पोलिसांना या गंभीर प्रकाराची माहिती दिली. माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांचे पथक आणि मुलीचे कुटुंबीय तातडीने संबंधित ठिकाणी पोहोचले.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी चेतन याला ताब्यात घेतले आणि अपहरण झालेल्या मुलीसह अन्य तीन अशा चार अल्पवयीन मुलींची सुखरुप सुटका केली. मात्र, या घटनेमागील नेमका हेतू काय होता याबाबतचा कोळसेवाजी पोलीस अधिक तपास करत आहेत.