Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: सतीश भोसले प्रकरणात सुरेश धसांनाही सहआरोपी कऱण्याची मागणी; नेमकं काय आहे कारण?

बीड जिल्ह्यातील शिरूरकासार येथे सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या अटकेसाठी निघालेल्या आक्रोश मोर्चात ढाकणे कुटुंबीयही सहभागी झाले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 11, 2025 | 10:05 AM
Beed Crime: सतीश भोसले प्रकरणात सुरेश धसांनाही सहआरोपी कऱण्याची मागणी; नेमकं काय आहे कारण?
Follow Us
Close
Follow Us:

बीड : बीड जिल्ह्यातील शिरूरकासार येथे सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याच्यावर गुन्हा दाखल असूनही तो अद्याप फरार आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ आणि त्याला तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी आज शिरूर शहर बंद ठेवण्यात आले आहे. तसेच, स्थानिक पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये शेकडो नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या मोर्चात ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सकाळी ९ वाजता निघालेल्या या मोर्चात सहभागी झालेल्यांनी भाजप आमदार सुरेश धस यांना सहआरोपी करण्याची मागणी केली. तसेच, आरोपीला पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा सहा प्रमुख मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील शिरूरकासार येथे सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या अटकेसाठी निघालेल्या आक्रोश मोर्चात ढाकणे कुटुंबीयही सहभागी झाले होते. या वेळी महेश ढाकणे यांनी आपल्या भावना व्यक्त करत, सतीश भोसलेविरोधात एसआयटी (विशेष तपास पथक) चौकशीची मागणी केली.

Jagdeep Dhankhar Health News: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती खालावली; एम्समध्ये उपचार सुरू

“आम्हाला राहण्याची भीती वाटते, रात्रभर झोप लागत नाही. माझ्या वडिलांचे दात पडले, माझा पाय फ्रॅक्चर झाला आहे. सतीश भोसलेने किमान 200 हरणांची शिकार केली आहे, त्यामुळे त्याची सखोल चौकशी व्हावी आणि त्याला लवकरात लवकर अटक करावी,” असे महेश ढाकणे म्हणाले.तसेच, “सतीश भोसलेने आम्हाला मरणाच्या उंबरठ्यावर आणले. आमच्यावर हल्ला करणाऱ्या सर्वांना लवकर अटक झाली पाहिजे. त्याने खड्डे करून काहीतरी पुरले आहे, त्याची तपासणी करावी. हरणांची शिकार करून तो स्कॉर्पिओ गाडीतून नेतोय, हे मी स्वतः पाहिले आहे,” असे गंभीर आरोप त्यांनी केले. या मागण्यांसह, मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.

शिरूरकासार येथे सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या अटकेसाठी निघालेल्या आक्रोश मोर्चात दिलीप ढाकणे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.”मोर्चात सहभागी झालेल्या सर्वांचा मी आभारी आहे. आम्हाला एवढं मारलं याचं आम्हाला कमी दुःख आहे, पण मला सर्वात जास्त दुःख हरणांसारख्या वन्य प्राण्यांच्या निर्दयी हत्येचं आहे. मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला म्हणून माझ्यावर इतका हल्ला झाला. जर मानवावर असा हल्ला केला जात असेल, तर मुक्या प्राण्यांवर किती क्रूरता केली जात असेल, याचा विचार करा,” असे त्यांनी सांगितले. “आमची एकच मागणी आहे—या सर्व आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे.”मोर्चेकऱ्यांनीही आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करत प्रशासनावर दबाव वाढवला आहे.

Web Title: Demand for the arrest of suresh dhas in the satish bhosale case what is the exact reason nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 01:29 PM

Topics:  

  • Beed crime News

संबंधित बातम्या

Beed Crime: आज माझा वाढदिवस, तुझा मूळशी पॅटर्न करतो! अंबाजोगाईत तरुण व्यापाऱ्यावर लोखंडी कत्तीनं हल्ला
1

Beed Crime: आज माझा वाढदिवस, तुझा मूळशी पॅटर्न करतो! अंबाजोगाईत तरुण व्यापाऱ्यावर लोखंडी कत्तीनं हल्ला

Beed Crime: बीड येथील गुन्हेगारी काही थांबेना! गटशिक्षणाधिकाऱ्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग
2

Beed Crime: बीड येथील गुन्हेगारी काही थांबेना! गटशिक्षणाधिकाऱ्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Beed Crime: बीड हादरलं! सातवीतील मुलीचं जबरदस्तीने लग्न, पतीकडून अत्याचार आणि आई-जावयाचे अनैतिक संबंध; दोघांनी मिळून…
3

Beed Crime: बीड हादरलं! सातवीतील मुलीचं जबरदस्तीने लग्न, पतीकडून अत्याचार आणि आई-जावयाचे अनैतिक संबंध; दोघांनी मिळून…

Beed Crime : पत्नीची निर्घृण हत्या,  पोटातले आतडे बाहेर काढले नंतर…, परळीतील डाबी गावातील थरकाप उडवणारी घटना
4

Beed Crime : पत्नीची निर्घृण हत्या, पोटातले आतडे बाहेर काढले नंतर…, परळीतील डाबी गावातील थरकाप उडवणारी घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.