
Wife Murder: पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर फरार पतीने उचलले टोकाचे पाऊल; शेतातील आग लावून...
मिळालेल्या माहितीनुसार, आनंदवाडी येथील रहिवासी विष्णू कदम आणि त्याची पत्नी भिवराबाई कदम (वय ५५) यांच्यात पतीच्या अनैतिक संबंधांवरून गेल्या काही काळापासून वारंवार वाद होत होते. हा घरगुती कलह इतका विकोपाला गेला की, सोमवारी पहाटेच्या सुमारास घरात शांत झोपलेल्या भिवराबाई यांच्या डोक्यात विष्णूने दगड घालून त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत महिलेचा मुलगा सुनील विष्णू कदम याने दिलेल्या फिर्यादीवरून वडील विष्णू कदम यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी विष्णू कदम घटनास्थळावरून पसार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी सचिन इंगळे यांनी तातडीने पोलिसांची विशेष पथके नियुक्त केली होती. पोलीस त्याचा कसून शोध घेत असतानाच मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एक अनपेक्षित आणि भयावह घटना घडली. विष्णू कदम याने स्वतःच्या शेतातील कपाशीच्या पऱ्हाट्यांच्या ढिगाला आग लावली आणि पेटत्या आगीत उडी घेतली. या घटनेत गंभीररीत्या भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुहेरी घटनेमुळे शिरूर तालुक्यात हळहळ आणि दहशतीचे वातावरण पसरले असून चकलांबा पोलीस पुढील तपास करत आहेत.
Ans: आनंदवाडी येथील विष्णू गणपत कदम याने सोमवारी पहाटे पत्नी भिवराबाई कदम हिची डोक्यात दगड घालून हत्या केली आणि त्यानंतर मंगळवारी रात्री स्वतःच्या शेतात आगीत उडी घेऊन आत्महत्या केली.
Ans: विष्णू कदम याच्या अनैतिक संबंधांवरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते, याच रागातून त्याने झोपलेल्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे.
Ans: पोलीस त्याचा शोध घेत असतानाच मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्याने स्वतःच्या शेतातील कपाशीच्या पऱ्हाट्यांच्या ढिगाला आग लावली आणि त्या पेटत्या ढिगात उडी घेऊन जीवन संपवले.