Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhananjay Munde News: ‘त्या’ खोट्या माहितीमुळे धनंजय मुंडेंचा पाय खोलात; मंत्रीपदानंतर आता आमदारकी धोक्यात

धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. करुणा शर्मा यांनी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 15, 2025 | 09:57 AM
Dhananjay Munde, Dhananjay Munde News

Dhananjay Munde, Dhananjay Munde News

Follow Us
Close
Follow Us:

बीड:  सरपंच  संतोष देशमुख हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणात नाव आल्यानंतर  विरोधकांसह राज्यभरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. त्यानंतर  धनंजय मुंडे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या अडचणी संपतील अशी शक्यता वर्तवली जात असतानाच आणखी एका प्रकरणामुळे त्यांच्या भोवतीचा फास आवळताना दिसत आहे.

धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. करुणा शर्मा यांनी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सुनावणी  शनिवारी (ता. 15) परळी न्यायालयात होणार आहे.

IIT च्या धर्तीवर मुंबईत IICT उभारणार; केंद्र सरकार करणार 400 कोटींची गुंतवणूक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची

करुणा शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,  2024 च्या परळी विधानसभा निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या शपथपत्रात धनंजय मुंडे यांनी त्यांच्याबाबत माहिती दिली होती. त्यात पत्नी राजश्री मुंडे, तीन मुले आणि करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. पण करुणा शर्मा यांच्या नावावर असलेल्या संपत्तीचा कोणताही उल्लेख त्यांनी त्या शपथपत्रात  केला नव्हता. त्यामुळे धनंजय मुंडेंनी संपत्तीची माहिती लपवली असल्याचा आरोप त्यांनी केला.

या अंतर्गत करुणा शर्मा यांनी परळीतील फौजदारी न्यायालयात ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेची दखल घेत  न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. आज या या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याने धनंजय मुंडे यांचे उत्तर काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे आरोप सिद्ध झाल्यास धनंजय मुंडेंना त्यांच्या आमदारकीचाही राजीनामा द्यावा लागू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Pune News : पुण्यात 91 जागी नाकेबंदी, नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांनी उगारला दंडाचा बडगा

फेब्रुवारी महिन्यात न्यायालयाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दोन लाख रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला होता. हा आदेश तात्पुरता (अंतरिम) असून, या प्रकरणात अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. दरम्यान, करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांनी त्यांच्या नावावरील संपत्तीची माहिती लपवली असल्याची तक्रार दाखल केल्याने, त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याची चर्चा आहे.

Web Title: Dhananjay mundes mla seat will be lost due to that false information nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2025 | 09:57 AM

Topics:  

  • Dhananjay Munde Resignation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.