Pune News : पुण्यात 91 जागी नाकेबंदी, नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांनी उगारला दंडाचा बडगा...
पुणे : पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत शहरात होळीचा सण आनंदाने, उत्साहाने साजरा व्हावा. ह्याकरिता प्रत्येकाने नियमांचे पालन करून, कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही अशा पध्दतीने साजरा करावा या विचारातून पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत 91 ठिकठिकानी नाकेबंदी करून तपासनी करण्यात आली. यावेळी पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने विविध भागात भेटी देऊन परिसराचा आढावा घेत होते. शुक्रवारी रंगपंचमीच्या पार्शभूमिवर पुणे पुलिस आयुक्ताल हद्दीत 1500 पोलीस कर्मचारी आणि 450 अधिकाऱ्यांचा दोन दिवस बंदोबस्त लावण्यात आला होता.
हेही वाचा : Pune Crime: आधी दांडक्याने बेदम मारहाण अन् नंतर पिस्तुलातून…; पुण्याच्या ‘या’ भागात नेमके घडले तरी काय?
यावेळी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त लावून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. अशी माहिती पुणे परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली. होळी सण साजरा होत असताना त्याला कोठेही गालबोट लागू नये, हुल्लडबाजी चे स्वरूप येऊ नये, याची काळजी गस्तीवरील पोलीसांकड़े देण्यात आली होती. तर वरिष्ठ अधिकारी वेगवेगळ्या भागातील परिस्थितिचा आढावा घेत होते.
हेही वाचा : Satish Wagh Case: सतीश वाघ हत्या प्रकरणात पोलिसांनी दाखल केले आरोपपत्र; समोर आली ‘ही’ धक्कादायक माहिती
पुणे परिमंडळातील बंदोबस्तामध्ये 450 पोलीस अधिकारी, 1500 कर्मचारी,गृहरक्षक जवानांचा त्यात समावेश आहे. वाहतूक पोलिसांकडून शहरातील मुख्य रस्ते, चौक, उड्डाण पूल भागात बंदोबस्त लावण्यात आला. या कालावधीत प्रत्येक वाहन चालकाची कसून तपासणी वाहतूक पोलीसांकडून करण्यात आली. होळी सणाच्या काळात अनेक उत्साही वाहन चालक मद्य सेवन करून दुचाकी, चारचाकी वाहने चालवतांना आढळ्यावर त्यांच्या विरुद्द तत्काळ वाहतूक पोलिसांनी चालान फाडून दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली.