धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. करुणा शर्मा यांनी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप केला आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. तपासादरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
विरोधकांनी आधीच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, याबाबत अद्याप धनंजय मुंडे किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.