मुंबई – दक्षिण कोरियाची (South Korea) महिला युट्यूबर ह्योजॉन्ग पार्क (Hyojeong Park) ही तरुणी खार परिसरातून लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) करत असताना दोन भारतीय तरुणांनी (Indian Boys) तिची छेडछाड (Teasing) केली. यातील एका आरोपीने पीडित तरुणीच्या गालावर जबरदस्तीने चुंबन घेतले. तसेच, तो पीडितेला दुचाकीवर बसण्यासाठी हाताला पकडून जबरदस्ती करत होता. हा सर्व प्रकार लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान घडला.
Finally meeting with Indian heroes?
Be my guess for the lunch today! pic.twitter.com/Um3lOeeciT— Mhyochi in ?? (@mhyochi) December 2, 2022
दक्षिण कोरियातील तरुणीच्या बाबतीमधील हा प्रकार लक्षात येताच दोन भारतीय तरुणांनी प्रसंगावधान दाखवत मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर (Video Viral) शेअर करत आरोपींना पकडण्यासाठी मदत केली. या प्रकारानंतर ह्योजॉन्ग पार्कने तिला मदत करणाऱ्या दोन्ही तरुणांची भेट घेतली आहे. तिघांनी एकत्र जेवण केले. याबाबतचे फोटो स्वत: पार्कने सोशल मीडियावर शेअर करत आभार मानले. आदित्य आणि अथर्व अशी मदत करणाऱ्या दोन तरुणांची नावे आहेत.
Lunch with two Indian gentlemen who help me to post the video and save me on the street?
Aditya & Atharva pic.twitter.com/Cu9IYOjBMb— Mhyochi in ?? (@mhyochi) December 2, 2022
पीडित युट्यूबर महिलेचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहिल्यानंतर अथर्वने तिच्या बचावासाठी घटनास्थळी धाव घेतली. त्याने दोन्ही आरोपींना हुसकावून लावत ह्योजॉन्गला सुरक्षितपणे हॉटेलपर्यंत पोहोचण्यास मदत केली. तर आदित्यने संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत पोलीस कारवाईसाठी तरुणीची मदत केली. त्यामुळे ह्योजॉन्ग पार्कने या दोघांसोबत मुंबईमध्ये एका हॉटेलमध्ये जेवण केले. तसेच, अखेर आज भारताच्या हिरोंना लंचसाठी भेटले, असे कॅप्शन दिले आहे.
Coffee with Indian Gigachad? @AtharvaTikkha pic.twitter.com/6GjpnXPSFA
— Mhyochi in ?? (@mhyochi) December 2, 2022