Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरला मारहाण; कॉलर पकडली, ढकलून ठोसाही लगावला

सर्जरी विभागात रुग्णाला उपचारासाठी आणले होते. त्याचवेळी दुसरा गंभीर रुग्ण उपचारासाठी दाखल झाला. प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन निवासी डॉक्टर डॉ. समीर चांदेकर यांनी प्रथम गंभीर रुग्णाची तपासणी सुरू केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 05, 2026 | 09:22 AM
रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरला मारहाण; कॉलर पकडली, ढकलून ठोसाही लगावला

रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरला मारहाण; कॉलर पकडली, ढकलून ठोसाही लगावला

Follow Us
Follow Us:
  • नागपूरच्या मेयो रुग्णालयात डॉक्टरला मारहाण.
  • निवासी डॉक्टर डॉ. समीर चांदेकर यांना नातेवाईकांकडून मारहाण.
  • सर्जरी विभागात बुधवारी दुपारी घडली घटना.

नागपूर : रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरला मेयो रुग्णालयात मारहाण करण्यात आली. सर्जरी विभागात एका गंभीर रुग्णाला प्राधान्याने तपासल्याचा राग आल्याने नातेवाईकांनी निवासी डॉक्टर समीर चांदेकर यांना मारहाण केली. त्यांची कॉलर पकडून खाटेवर ढकलले. एवढ्यावरच न थांबता ठोसेही लगावले. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी सर्जरी विभागात रुग्णाला उपचारासाठी आणले होते. त्याचवेळी दुसरा गंभीर रुग्ण उपचारासाठी दाखल झाला. प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन निवासी डॉक्टर डॉ. समीर चांदेकर यांनी प्रथम गंभीर रुग्णाची तपासणी सुरू केली. मात्र, आमच्या रुग्णाला आधी तपासा, त्यानंतर दुसऱ्या रुग्णाकडे लक्ष द्या, असा आग्रह नातेवाईकांनी धरला. यावरून डॉक्टर आणि नातेवाईकांमध्ये वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर काही क्षणांतच हिंसक प्रकारात झाले. संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना शिवीगाळ करत अंगावर धाव घेतली. कॉलर पकडून ओढले व खाटेवर ढकलले. त्यानंतर ठोसाही लगावला. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

मारहाण करणारे रुग्णाचे नातेवाईक पोलिस असल्याची माहिती पुढे आली. मेयोचे अधिष्ठाता डॉ. अविनाश गावंडे यांनी या घटनेची तत्काळ दखल घेतली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन शेंडे यांनी तहसील पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. मार्डतर्फे मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली.

डॉक्टर असुरक्षितच

रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण होऊ नये, त्यांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी शासनाने महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान तैनात केले. कोट्यवधीचा खर्च करूनही गंभीर आणि अत्यवस्थ रुग्णांना त्यांच्या प्रकृतीनुसार प्राधान्याने उपचार देताना नातेवाईकांकडून मारहाण होते, ही गंभीर बाब आहे. मेयोत डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा प्रकार निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

FAQ

१. डॉक्टरला मारहाणीची घटना कुठे घडली?

नागपूर येथील मेयो रुग्णालयात ही घटना घडली.

२. मारहाण झालेल्या डॉक्टरांचे नाव काय आहे?

निवासी डॉक्टर डॉ. समीर चांदेकर यांना मारहाण करण्यात आली.

३. डॉक्टरांना मारहाण का करण्यात आली?

दुसऱ्या गंभीर रुग्णाला प्राधान्याने तपासल्याचा राग आल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांशी वाद घातला.

Web Title: Doctor assaulted by patients relatives incident in nagpur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

धक्कादायक ! शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रकरणात मध्यस्थी केल्याने शिक्षकाला भररस्त्यात अडवून मारहाण; जीवे मारण्याचीही धमकी
1

धक्कादायक ! शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रकरणात मध्यस्थी केल्याने शिक्षकाला भररस्त्यात अडवून मारहाण; जीवे मारण्याचीही धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.