Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रकरणात मध्यस्थी केल्याने शिक्षकाला भररस्त्यात अडवून मारहाण; जीवे मारण्याचीही धमकी

विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून निर्माण झालेल्या प्रकरणात पुरुषोत्तम हगवणे हे शाळेत आले होते. त्यावेळी पालक आणि सहकारी शिक्षकांनी मध्यस्थी करून संबंधित पालकांची समजूत काढली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 04, 2026 | 09:36 AM
धक्कादायक ! शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रकरणात मध्यस्थी केल्याने शिक्षकाला भररस्त्यात अडवून मारहाण; जीवे मारण्याचीही धमकी

धक्कादायक ! शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रकरणात मध्यस्थी केल्याने शिक्षकाला भररस्त्यात अडवून मारहाण; जीवे मारण्याचीही धमकी

Follow Us
Follow Us:
  • नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे शिक्षकाला मारहाण केल्याची घटना घडली.
  • शाळेतील विद्यार्थ्यांच्या तक्रारीच्या प्रकरणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
  • शैलेश चव्हाण हे एका नामांकित विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

काटोल : शाळेतील विद्यार्थ्यांच्या तक्रारीच्या प्रकरणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून एका शिक्षकाला रस्त्यात अडवून मारहाण केल्याची घटना कोंढाळी येथे घडली. यावेळी अश्लील व जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या घटनेमुळे शिक्षकवर्गासह परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश चव्हाण (वय ४४, रा. कोंढाळी) हे एका नामांकित विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून निर्माण झालेल्या प्रकरणात पुरुषोत्तम हगवणे हे शाळेत आले होते. त्यावेळी पालक आणि सहकारी शिक्षकांनी मध्यस्थी करून संबंधित पालकांची समजूत काढली होती. त्यामुळे हे प्रकरण मिटले होते. मात्र, या प्रकरणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून आरोपी पुरुषोत्तम हगवणे (वय ५४, रा. कोंढाळी) याने २ नोव्हेंबर रोजी चारचाकी वाहनाने येऊन शैलेश चव्हाण यांना रस्त्यात अडविले.

‘शाळेच्या प्रकरणात मध्यस्थी करण्याची तुला काय गरज होती?’ असे म्हणत अश्लील शिवीगाळ केली आणि गालावर बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

स्थानिक नागरिकांनी घटनेचा केला निषेध

३ नोव्हेंबर रोजी स्थानिक नागरिकांनी पोलिस ठाण्यात निवेदन देऊन या घटनेचा निषेध केला. जातिवाचक शिवीगाळ व मारहाणीच्या आरोपांची दखल घेऊन संबंधित आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पसार असून, पुढील तपास कोंढाळी पोलिस करत आहेत. शाळेतील वादाचे पडसाद रस्त्यावर उमटल्याने शिक्षकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

FAQ

प्रश्न 1: शिक्षकाला मारहाण केल्याची घटना कुठे घडली?

उत्तर: नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे ही घटना घडली.

प्रश्न 2: मारहाण झालेल्या शिक्षकाचे नाव काय आहे?

उत्तर: शैलेश चव्हाण (४४) असे शिक्षकाचे नाव आहे.

प्रश्न 3: शिक्षकाला मारहाण करण्यामागचे कारण काय आहे?

उत्तर: शाळेतील विद्यार्थ्यांच्या तक्रारीच्या प्रकरणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून मारहाण केल्याचा आरोप आहे.

Web Title: Teacher beaten by student incident in nagpur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • crime news
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

पुणे हादरलं! बर्फाचा गोळा घेण्याच्या बहाण्याने घरात शिरून मुलींचा विनयभंग; नराधम शिक्षकाला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
1

पुणे हादरलं! बर्फाचा गोळा घेण्याच्या बहाण्याने घरात शिरून मुलींचा विनयभंग; नराधम शिक्षकाला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

रूपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी अपडेट! तीन आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
2

रूपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी अपडेट! तीन आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

भेटायला बोलावले अन् कोयत्याने सपासप वार केले! पुण्यात अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला
3

भेटायला बोलावले अन् कोयत्याने सपासप वार केले! पुण्यात अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला

ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी मुख्य अभियंता अटकेत! न्यायालयाच्या आदेशानंतर येरवडा कारागृहात रवानगी
4

ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी मुख्य अभियंता अटकेत! न्यायालयाच्या आदेशानंतर येरवडा कारागृहात रवानगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.