Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुंगीचे औषध देऊन रुग्णाच्याच खिशातून काढले 55 हजार; डॉक्टरच्या कृत्याने एकच खळबळ

बिच्छूटेकडी येथील आमिर खान पठाण यांचे वडील गौस खान पठाण हे 5 नोव्हेंबर रोजी आजारी पडले. त्यांच्यावर आमिर खान यांनी राहुल नावाच्या तरुणाला फोन करून डॉक्टरला पाठवण्यास सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 24, 2025 | 12:12 PM
वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा

वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : वडिलांच्या उपचारासाठी घरी बोलावलेल्या डॉक्टरने रुग्णाला गुंगीचे औषध देऊन रुग्णाच्याच खिशातील 55 हजार रुपये काढून घेतल्याची घटना समोर आली. ही घटना 5 नोव्हेंबर 2024 रोजी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिच्छुटेकडी परिसरात घडली होती. याप्रकरणी मुलगा अमीर खान घौस खान पठाण (वय 36) यांनी मंगळवारी (दि. 21) पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणात पोलिसांनी डॉक्टर रहेमान पटेल यांच्यावर गुन्हा दाखल केला.

हेदेखील वाचा : घरच्या ‘लक्ष्मी’चा चिमुकल्यासमोरच कात्रीने चिरला गळा: रक्ताच्या थारोळ्यातील Video रेकॉर्ड केला; म्हणाला, ‘मी तिला…’

बिच्छूटेकडी येथील आमिर खान पठाण यांचे वडील गौस खान पठाण हे 5 नोव्हेंबर रोजी आजारी पडले. त्यांच्यावर आमिर खान यांनी राहुल नावाच्या तरुणाला फोन करून डॉक्टरला पाठवण्यास सांगितले. त्यानंतर डॉक्टर रहेमान पटेल हा आमिर खान यांच्या घरी पोहोचला. तुमच्या वडिलांना दोन ते तीन तास उपचार करावे लागतील, असे त्याने सांगितले. त्यानंतर डॉ. रहेमानने उपचार सुरू केले. त्या दरम्यान आमिर खान हे कामावर गेले. दुपारी 2 वाजता ते घरी परतल्यानंतर त्यांनी वडिलांना विचारले की, डॉक्टरांनी उपचारासाठी किती वेळ घेतला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, गुंगीचे औषध दिल्यानंतर ते बेशुध्द झाले.

त्यानंतर 1 वाजता डॉक्टर निघून गेले, पण मला आराम मिळाला नाही. मात्र, सकाळी खिशात ठेवलेले 55 हजार रुपये गायब झाले होते. त्यामुळे आमिर खान यांनी डॉ. रहेमानला फोन केला. मात्र, त्यांचा मोबाईल बंद होता. त्यानंतर राहुल नावाच्या तरुणाला फोन केला असता त्याचा मोबाईलही बंद असल्याचे दिसून आले, असे आमिर खान यांनी तक्रारीत म्हटले. वडिलांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांनी तक्रार दाखल केली नव्हती.

महिलेवर सलग पाच दिवस लैंगिक अत्याचार

दुसऱ्या घटनेत, पीडित महिला ही ड्रिमलँड मार्केटमधील एका दुकानात लोकर शिवण्याचे काम गुलाम अन्सारीकडून शिकत होती. दरम्यान, 6 ऑगस्ट 2024 रोजी ड्रीमलॅन्डमध्ये धाड पडणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे आरोपीने कारखान्याचे शेटर बंद केले आणि महिलेशी अश्लिल वर्तन सुरु केले. त्यामुळे तिने आरडाओरड केली असता जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर रविवारपासून (दि. 19) पुन्हा पाच दिवस आरोपीने महिलेला धमकावून अत्याचार केला.

हेदेखील वाचा : Shivani Duble Death : नागपूरच्या तरुणीचा पॅराग्लायडिंग अपघातात मृत्यू, अचानक दोर तुटल्याने 100 फुटांवर थेट जमिनीवर

Web Title: Doctor looted patient in amravati nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 12:12 PM

Topics:  

  • amaravati crime news
  • Amravati News

संबंधित बातम्या

Amravati : पोलिस आणि प्रशासनाने न्यायालयीन प्रक्रियेनुसार काम करावे, वंचित बहुजन आघाडी
1

Amravati : पोलिस आणि प्रशासनाने न्यायालयीन प्रक्रियेनुसार काम करावे, वंचित बहुजन आघाडी

घरातच सुरु होता वेश्याव्यवसाय; पोलिसांना मिळाली माहिती अन् धाड टाकताच झाला पर्दाफाश
2

घरातच सुरु होता वेश्याव्यवसाय; पोलिसांना मिळाली माहिती अन् धाड टाकताच झाला पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.