पुण्यात हत्येचा भयानक थरार (फोटो- istockphoto/टीम नवराष्ट्र)
Pune Crime News: पुण्यातील उच्चभ्रू असणाऱ्या खराडीत अंगावर शहारे आणणारी घटना घडली असून, पाच वर्षाच्या मुलाला खुर्चीवर बसवून त्याच्यासमोर आईचा वडिलांनी कात्रीने गळा चिरून निर्घुन खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला मुलगा पाहत बसल्यानंतर वडिल म्हणाऱ्या आरोपीने मोबाईलमध्ये एक व्हिडीओ तयारकरून मी का मारले याची कहाणी सांगितली. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेने पुन्हा शहरात खळबळ उडाली आहे.
ज्योती शिवदास गिते (वय २८, रा. गल्ली क्रमांक ५, तुळजाभवानी नगर, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते (वय ३७) याला अटक केली आहे. बुधवारी (२२ जानेवारी) पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी शिवदास मूळचा बीडमधील आहे. तो न्यायालायात टंकलेखक आहे. ज्योती शिलाई मशीनवर कपडे शिवण्याचे आणि धुणे भांड्यांची कामं करत होती. तुळजाभवानीनगर भागात तो भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होता. त्यांचा २०१६ मध्ये विवाह झाला होता. त्यांना ५ वर्षाचा अथर्व नावाचा एक मुलगा होता.
हेही वाचा: Crime News: पोलीस असल्याचे सांगितले अन् महिलेचे…; ‘या’ शहरातील धक्कादायक घटना
शिवदास हा पत्नीवर चारित्रावर संशय घेत होता. यातून त्यांच्यात अनेक वेळा भांडण होत होते. जानेवारी १५ रोजी झालेल्या एका परीक्षेत शिवदास हा नापास झाल्याने त्याला कामावरून कमी केले होते. परीक्षा परत देण्यासाठी ज्योती शिवदासला संगत होती. २२ जानेवारी रोजी जेव्हा ज्योतीचे तिच्या बहिणीसोबत बोलणे झाले तेव्हा तिने शिवदास हिला त्रास देत असल्याचे सांगितले होते. घटनेच्या दिवशी पहाटे पुन्हा त्यांच्यात वाद झाला. शिवदासने शिलाई मशीनवर ठेवलेली कात्री घेतली आणि तिच्या गळ्यावर सपासप वारकरून तिचा निर्घुन खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास खराडी पोलीस करत आहेत.
अन् मुलाला खुर्चीवर बसवले
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ज्योतीचा व्हिडिओ शिवदासने काढला. तो व्हिडीओमध्ये पत्नीने मला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ती मारेल या भितीपोटी आपण तिला मारल्याचे म्हंटले आहे. त्याने तब्बल साडे तीन मिनिटांचा व्हिडीओ तयार केला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ तयार करताना पत्नी रक्ताच्या थारोळ्यात होती आणि मुलाला त्याने खुर्चीवर बसविलेले होते. मुलगा प्रंचड भयभित झालेला होता. तरीही त्याने हा व्हिडीओ काढून एका ग्रुपवर टाकला होता.
हेही वाचा: पुण्यात बारमधील ग्राहकांना बेदम मारहाण; तब्बल 12 जणांवर गन्हा दाखल
शिवदास स्वत: पोलीस ठाण्यात हजर
शिवदासने पत्नी ज्योतीचा खून केल्यानंतर व्हिडीओ तयार केला. नंतर तो स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांना खून केल्याची माहिती दिली. पोलीस धावपळ करत घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा पोलीसही दृष्य पाहून चक्रावून गेले. पोलिसांनी शिवदासला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.