Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मद्यधुंद चालकांना पुणे पोलिसांचा दणका! एकाच दिवसात ४५५ चालकांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची कारवाई

कारवाई केलेल्या सर्व व्यक्तींना आज, बुधवारी येरवडा येथील वाहतूक शाखेच्या मुख्य कार्यालयात बोलविण्यात आले होते. तेथे पोलीस अधिकाऱ्यांनी या सर्वांचे समुपदेशन केले. यांना जेलची शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 04, 2026 | 07:46 PM
मद्यधुंद चालकांना पुणे पोलिसांचा दणका! एकाच दिवसात ४५५ चालकांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची कारवाई
Follow Us
Close
Follow Us:
  • होळी आणि धुळवडीच्या दिवशी (मार्च २०२६) पुणे पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी
  • मद्यपी चालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी आरटीओकडे (RTO) प्रस्ताव
  • केवळ कारवाई न करता, पोलिसांनी पकडलेल्या वाहनचालकांसाठी समुपदेशन सत्रेही आयोजित करणार
Drunk Driving Cases Pune: होळीच्या उत्सवाच्या दिवशी मद्यधुंद अवस्थेत झिंगाट होऊन रस्त्यावर वाहने चालविणाऱ्यांवर पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. शहरात एका दिवसात तब्बल ४५५ वाहनांवर ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाई केल्या आहेत. तळीरामांकडून वाहने चालवून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घातला जात असताना शहर वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. (drunk drivers)

होळी आणि धुलीवंदनानिमित्त शहरात विविध ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले गेले होते. तरुणाई डीजेच्या तालात नाचत होती. रंगात बेभाहून होईन आनंद घेत असतानाच दुसरीकडे मद्यधुंद अवस्थेत काहीजन वाहने चालवित होते. यापार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी शहरातील विविध भागात नाकाबंदी केली. तसेच, अशा चालकांवर कारवाई केली.

मद्यप्राशन करून रस्त्यावर वाहने घेऊन येतात, ज्यामुळे भीषण अपघातांची शक्यता असते. त्यामुळेच यंदा विशेष मोहीम हाती घेतली होती. मंगळवारी दिवसभर आणि उशिरा रात्रीपर्यंत शहरातील प्रमुख चौक, महामार्ग व गर्दीच्या ३० ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून तपासणी केली. यादरम्यान ४५५ चालक मद्यधुंद अवस्थेत सापडले. नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या या बेशिस्त चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, या सर्वांवर न्यायालयात खटले भरले जाणार आहेत. त्यांना कठोर शासन व्हावे यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे.

Ajit Pawar Plane crash: अजित पवार यांच्या जिवाला धोका होता, ते सावध झाले होते- रोहित पवारांचा गौप्यस्फोट

…वाहतूक शाखेत झाले समुपदेशन

कारवाई केलेल्या सर्व व्यक्तींना आज, बुधवारी येरवडा येथील वाहतूक शाखेच्या मुख्य कार्यालयात बोलविण्यात आले होते. तेथे पोलीस अधिकाऱ्यांनी या सर्वांचे समुपदेशन केले. यांना जेलची शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.

 

कर्णकर्कश पावणे तीन हजार फटाका सायलेन्सरवर कारवाई

पुणे, शहरात बेशिस्त वाहन चालकांसोबतच रस्त्यांवर कर्णकर्कश आवाज काढत घिरट्या घालणाऱ्या तसेच ‘फटाकफटाक’ आवज काढणाऱ्यांवर जोरदार कारवाई केली. या सायलेन्सरद्वारे ध्वनीप्रदूषण तसेच ज्येष्ठ नागरिक व लहान मुले घाबरतात. अशा बुलेटस्वारांना शहर वाहतूक पोलिसांनी दणका दिला. गेल्या काही दिवसांत राबविलेल्या विशेष मोहिमेत तब्बल २ हजार ८२२ वाहनांवर कारवाई केली असून, जप्त केलेल्या ९०० मॉडीफाय सायलेन्सरवर पोलिसांनी थेट बुलडोझर फिरवून ते निकामी केले.

अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव उपस्थित होते. शहर परिसरात विशेषतः तरुण वर्गात बुलेटच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून जोरात आवाज काढण्याचे फॅड वाढले आहे. यामुळे रुग्णालय, शाळा आणि महाविद्यालयीन परिसरात ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत सातत्याने तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. याची दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार वाहतूक शाखेने शहरात व्यापक मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत एकूण २ हजार ८२२ वाहने दोषी आढळली असून, त्यापैकी ९०० मॉडीफाय सायलेन्सर पोलिसांनी घटनास्थळीच जप्त केले. या कारवाईतून आतापर्यंत २८ लाख १७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

अरे, आम्ही प्रेम पण करायचे नाही का? Baramati मध्ये प्रेमीयुगुलावर कोयत्याचा धाक दाखवला अन्…

दोन हजाराचा दंड, सायलेन्सरही जप्त

शहरातील हडपसर, कोरेगाव पार्क, विमानतळ, डेक्कन, भारती विद्यापीठ यांसह प्रमुख भागांत हे प्रकार मोठ्या प्रमाणात आढळले. पहिल्या गुन्ह्यासाठी १ हजार तर दुसऱ्या गुन्ह्यासाठी २ हजार रुपये दंड आकारला जात आहे. जप्त केलेले सायलेन्सर पुन्हा वापरात येऊ नयेत, यासाठी येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात त्यावर बुलडोझर चालवून त्यांचे तुकडे करण्यात आले. शहरात यापुढेही ही मोहीम अधिक तीव्रतेने सुरू राहणार असून बेशिस्त चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

… त्या गॅरेज चालकावर थेट गुन्हे
वाहनधारकांना मॉडीफाय सायलेन्सर बदलून देणाऱ्या गॅरेज चालकांवरही कारवाई केली जाणार आहे. अशा गॅरेज चालकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे यावेळी वाहतूक विभागाने स्पष्ट केले.

…कारवाई दृष्टिक्षेपात
– एकूण कारवाई केलेली वाहने: २,८२२
– जप्त केलेले सायलेन्सर: ९००
– वसूल केलेला दंड: २८ लाख १७ हजार रुपये

Web Title: Drunk and drive action taken against 455 drunk drivers in a single day in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 07:46 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.