• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ajit Pawars Life Was In Danger He Was Alert Rohit Pawars Revelation

Ajit Pawar Plane crash: अजित पवार यांच्या जिवाला धोका होता, ते सावध झाले होते- रोहित पवारांचा गौप्यस्फोट

अजित पवार यांना जाणूनबुजून जुने विमान देण्यात आले. विमानतळावर पायलटची बीए (श्वास विश्लेषक) चाचणी अनिवार्य आहे, परंतु या पायलटची बीए चाचणी विमानात घेण्यात आली होती का,

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 04, 2026 | 07:22 PM
Ajit Pawar Plane crash: अजित पवार यांच्या जिवाला धोका होता, ते सावध झाले होते- रोहित पवारांचा गौप्यस्फोट

अजित पवार यांच्या जिवाला धोका होता, ते सावध झाले होते- रोहित पवारांचा गौप्यस्फोट

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • व्हिडिओत विमान डावीकडे झुकलेले दिसते, पण अहवालात ‘उजवीकडे’ असे नमूद आहे
  • खराब हवामान असताना बारामतीला उड्डाण करण्याची परवानगी कोणी दिली?
  • ब्लॅक बॉक्स सुस्थितीत असूनही आतील डेटा कसा खराब झाला?
Ajit Pawar Plane crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित विमान अपघाताबाबत विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) च्या अहवालात अनेक त्रुटी असल्याचा दावा केला आहे. एएआयबीच्या अहवालात टायपिंगसह अनेक त्रुटी आहेत आणि एएआयबी तपासाबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.  (Ajit Pawar Plane Crash)

रोहित पवार म्हणाले की, “अपघाताच्या वेळी विमान उजवीकडे झुकले होते, तर अपघाताच्या व्हिडिओमध्ये विमान डावीकडे झुकलेले दिसते. अहवालात असे म्हटले आहे की, विमान झाडांना धडकले, परंतु घटनास्थळी कोणतेही झाडे नाहीत तर फक्त लहान गवत होते.”

Rohit Pawar PC : अजित पवारांच्या अपघाताला नवे वळण! घटनेपूर्वी बारामती विमान तळाची रेकी? आमदार रोहित पवार यांचा धक्कादायक दावा

AAIBच्या अहवालातील त्रुटींचे दावे

रोहित पवार म्हणाले, “AAIBचा तपास भविष्यात असे अपघात रोखण्यासाठी आहे. अपघातासाठी कोण जबाबदार आहे, याची चौकशी झालीच पाहिजे. नियमांनुसार, योग्य दृश्यमानतेशिवाय विमान उडू शकत नाही. तर, बारामतीमध्ये दृश्यमानता कमी असताना, विमानाला मुंबईहून बारामतीला उड्डाण करण्याची परवानगी का देण्यात आली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वायएसआर रेड्डी यांच्या मृत्यूनंतर, खराब हवामानाच्या बाबतीत सुरक्षित ठिकाणी उतरणे आवश्यक असलेले कठोर नियम लागू करण्यात आले. तर, या विमानाने बारामतीमध्ये उतरण्याचा प्रयत्न का केला?”असंही त्यांनी विचारलं.

“अजित पवार यांना जाणूनबुजून जुने विमान देण्यात आले. विमानतळावर पायलटची बीए (श्वास विश्लेषक) चाचणी अनिवार्य आहे, परंतु या पायलटची बीए चाचणी विमानात घेण्यात आली होती का, त्या दिवशी इतका दूरचा प्रवास करायचा नसतानाही विमानात ९०% इंधन का भरण्यात आले? ब्लॅक बॉक्स चांगल्या स्थितीत आहे… मग डेटा कसा खराब झाला? फ्लाइट रडार वेबसाइटवरून या विमानाची जुनी माहिती का हटवण्यात आली?” याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

Devendra Fadnavis : स्फोटक कारखान्यांसाठी नियमांमध्ये सुधारणासाठी केंद्र शासनाकडे निवेदन-

शिंदे यांच्या विमानालाही लक्ष्य करण्यात आले होते का?

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “१६-२० जानेवारी २०२३ रोजी, एकनाथ शिंदे दावोसला जात होते, त्यावेळी इंधन भरण्यासाठी बहरीनमध्ये थांबले. इंधन भरल्यानंतर, त्यांचे व्हीएसआर विमान आधी इराणच्या हवाई हद्दीत दाखल झाले, तिथे त्यांना विमान थांबवण्यात मनाई करण्यात आली. त्यानंतर विमान इराकच्या हवाई हद्दीत गेले, पण तिथेही त्यांना विमान उतरवण्यास नकार देण्यात आला, त्यामुळे विमान पुन्हा बहरीनला नेण्यात आले. तिथे सर्व परवनग्या घेऊन त्या विमानाचे उड्डाण करण्यात आले. मग, जे अजित पवार यांच्यासोबत झाले, ते एकनाथ शिंदेसोबतही होणार होते का, असा आमचा प्रश्न आहे. VSR कंपनीचा मालक आमच्या कर्मचाऱ्याला म्हणतो, माझं कोणी काही बिघडवू शकत नाही. VSR च्या मालकामध्ये असे बोलण्याची हिंमत कुठून आणि कुणामुळे आली, असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

अजित पवार त्यांच्या मृत्यूपूर्वी खबरदारी

“दादांना न्याय मिळावा, यासाठी आम्ही राहुल गांधींना भेटू. आम्ही त्यांना लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यास सांगू. असंही रोहित पवारांनी सांगितलं. रोहित पवार म्हणाले, “घटनेपूर्वी दादा सुमारे पाच महिने अत्यंत खबरदारी घेत होते. त्यांनी प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणे बंद केले होते; ते फक्त काचेच्या ग्लासमधून पाणी पित होते. पाणी दूषित करण्याचा प्रयत्न असू शकतो. अजित दादांना आम्ही विचारलं, ते असं का करत आहेत, तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की, त्यांना सावध राहण्याच्या आणि खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. ते सरकारी सुरक्षा रक्षकांसोबतच खाजगी सुरक्षा रक्षकही सोबत ठेवत होते.असा दावाही रोहित पवार यांनी केला.

Web Title: Ajit pawars life was in danger he was alert rohit pawars revelation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 07:22 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • Eknath Shinde
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Rohit Pawar PC : अजित पवारांच्या अपघाताला नवे वळण! घटनेपूर्वी बारामती विमान तळाची रेकी? आमदार रोहित पवार यांचा धक्कादायक दावा
1

Rohit Pawar PC : अजित पवारांच्या अपघाताला नवे वळण! घटनेपूर्वी बारामती विमान तळाची रेकी? आमदार रोहित पवार यांचा धक्कादायक दावा

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?
2

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Eknath Shinde : उपमुख्यमंत्र्यांची अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पायपीट, विशेष विमानांची केली व्यवस्था
3

Eknath Shinde : उपमुख्यमंत्र्यांची अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पायपीट, विशेष विमानांची केली व्यवस्था

‘जय पवारांनी ट्विट केलेला व्हिडिओ अजितदादांच्या विमानातील नाही’; छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले…
4

‘जय पवारांनी ट्विट केलेला व्हिडिओ अजितदादांच्या विमानातील नाही’; छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
SA Vs NZ Semi Final Live: दक्षिण आफ्रिकेला ‘यान्सन-स्टब्स’ने तारले; न्यूझीलंडसमोर 169 धावांचे लक्ष्य

SA Vs NZ Semi Final Live: दक्षिण आफ्रिकेला ‘यान्सन-स्टब्स’ने तारले; न्यूझीलंडसमोर 169 धावांचे लक्ष्य

Mar 04, 2026 | 08:44 PM
US Iran War: श्रीलंका किनारपट्टीवर खळबळ! रडारवर आलेले इराणी जहाज पाणबुडी हल्ल्यात उद्ध्वस्त; ८० जणांचा मृत्यू तर…

US Iran War: श्रीलंका किनारपट्टीवर खळबळ! रडारवर आलेले इराणी जहाज पाणबुडी हल्ल्यात उद्ध्वस्त; ८० जणांचा मृत्यू तर…

Mar 04, 2026 | 08:43 PM
‘ही’ ऑफर हातची जाऊ देऊ नका! Tata Motors च्या ‘या’ कारवर 1 लाख रुपये वाचवण्याची संधी

‘ही’ ऑफर हातची जाऊ देऊ नका! Tata Motors च्या ‘या’ कारवर 1 लाख रुपये वाचवण्याची संधी

Mar 04, 2026 | 08:32 PM
सकाळी पोट साफ होत नाही? दिवसभर जडपणा वाटतो? मग दह्यात हा एक पदार्थ मिसळून खा, आतड्यांमधील सर्व घाण होईल साफ

सकाळी पोट साफ होत नाही? दिवसभर जडपणा वाटतो? मग दह्यात हा एक पदार्थ मिसळून खा, आतड्यांमधील सर्व घाण होईल साफ

Mar 04, 2026 | 08:15 PM
IPL 2026: मैदानावर उतरण्यापूर्वीच एमएस धोनीला मोठा दणका; रांची ट्रॅफिक पोलिसांनी ठोठावला दंड

IPL 2026: मैदानावर उतरण्यापूर्वीच एमएस धोनीला मोठा दणका; रांची ट्रॅफिक पोलिसांनी ठोठावला दंड

Mar 04, 2026 | 08:13 PM
क्रीडा परंपरा अधिक बळकट करण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा मोठा निर्णय

क्रीडा परंपरा अधिक बळकट करण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा मोठा निर्णय

Mar 04, 2026 | 07:59 PM
‘PCIFF 2026’ चा समारोप! ‘क्रांतिज्योती विद्यालय’ चित्रपटाचा होणार विशेष प्रीमियर

‘PCIFF 2026’ चा समारोप! ‘क्रांतिज्योती विद्यालय’ चित्रपटाचा होणार विशेष प्रीमियर

Mar 04, 2026 | 07:56 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.