Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाईतील मद्यपींची वरात थेट पोलीस ठाण्यात; सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना दणका, पोलिसांची धडक कारवाई

घाटावर शांतपणे बसलेले काही जण पोलिसांच्या अचानक कारवाईमुळे थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. आणि शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली. मंदिर परिसर, घाट आणि स्मशानभूमीत मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या १२ जणांवर पोलिसांनी कारवाई करत सहा गुन्हे दाखल केले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 04, 2026 | 12:22 PM
वाईतील मद्यपींची वरात थेट पोलीस ठाण्यात; सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना दणका, पोलिसांची धडक कारवाई

वाईतील मद्यपींची वरात थेट पोलीस ठाण्यात; सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना दणका, पोलिसांची धडक कारवाई

Follow Us
Follow Us:
  • वाईतील मद्यपींची वरात थेट पोलीस ठाण्यात
  • घाट, मंदिर परिसर अन् स्मशानभूमीत मद्यपींचा धिंगाणा
  • सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर धडक कारवाई
Wai Crime News: मंदिर परिसर, पवित्र घाट, स्मशानभूमी तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून नागरिक आणि भाविकांना त्रास देणाऱ्या मद्यपींविरोधात वाई पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. या कारवाईत १२ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत कायदेशीर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

स्मशानभूमीत मद्यपान, शिवीगाळ करून धिंगाणा

वाई शहरातील मंदिरांच्या परिसरामागे मद्यपान करून दारूच्या बाटल्या फोडणे, पसरणी घाटातील कट्ट्यांवर बसून मद्यपान करणे आणि त्याच ठिकाणी कचरा टाकणे, तसेच कृष्णा नदीच्या तीरावरील घाट आणि स्मशानभूमी परिसरात मद्यपान करून शिवीगाळ व गोंधळ घालण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे नागरिक आणि भाविकांमध्ये नाराजी होती. या प्रकारांना आळा घालण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे आणि वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली १ सप्टेंबर रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली.

हेही वाचा: ५ सुवर्ण,६ रौप्य पदकांची मानकरी…‘महाराष्ट्राची वाघीण’म्हणून ओळख; अश्विनीने तीन मुलांसह उचलले टोकाचे पाऊल

चार पथके एकाच वेळी मैदानात

वाई पोलीस ठाण्याची चार विशेष पथके एकाच वेळी कारवाईसाठी रवाना करण्यात आली. गणपती घाट, पसरणी घाट, परखंदी रोड, विविध स्मशानभूमी परिसर तसेच शहरातील अन्य महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी तपासणी सुरू केली. आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह संबंधित ठिकाणी छापे टाकले. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून नागरिकांना त्रास देणाऱ्या १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.

सहा गुन्हे दाखल

या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ८५(१) आणि ७५(क) अन्वये एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा रजिस्टर क्रमांक २५६, २५७, २५९, २६०, २६१ आणि २६२/२०२६ यांचा त्यात समावेश आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि होमगार्डच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Drunkards in wai marched straight to the police station a stern message for those creating a ruckus after drinking in public police launch a major crackdown

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 12:22 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.