Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाघोलीत डंपरने 9 जणांना चिरडल्याचे प्रकरण; पोलिसांकडून मालकावर अटकेची कारवाई

मालकाने मद्यपी डंपर चालकाला गाडी चालविण्यासाठी द्यायला नको होती. तसेच त्याला नोकरीवर ठेवताना गाडी चालविताना मद्य प्राषन करून गाडी चालवयची नाही असेही नोकरीवर ठेवण्यापूर्वी वारंवार सांगणे अपेक्षीत होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 24, 2024 | 09:49 PM
वाघोलीत डंपरने 9 जणांना चिरडल्याचे प्रकरण; पोलिसांकडून मालकावर अटकेची कारवाई

वाघोलीत डंपरने 9 जणांना चिरडल्याचे प्रकरण; पोलिसांकडून मालकावर अटकेची कारवाई

Follow Us
Follow Us:
पुणे: नगर रस्त्यावरील डंपरने कामगारांना चिरडल्याप्रकरणात पोलिसांनी डंपर मालकाला अटक केली आहे. त्याने निष्काळजीपणा केल्याचा आरोप ठेवून त्याला अटक केली आहे.  अनिल काटे (३९) असे अटक करण्यात आलेलया डंपर मालकाचे नाव आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांत गुन्हा नोंद आहे. नगर रस्त्यावरील वाघोली चौकात भरधाव डंपर चालकाने मध्याच्या नशेत फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना चिरडले होते. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर 6 जण जखमी झालेले आहेत. यात एक तरुणी गंभीर असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिसांनी अनिल काटे याला वाघोली पोलीस ठाण्यात चौकशीस बोलविले होते. तपासात अनिल काटे याला डंपर चालकाला दारू पिण्याच व्यसन होते हे माहिती होते. जेव्हा डंपर चालक डंपर घेऊन चालला होता तेव्हा काटे याला याबाबत माहिती होती. तसेच चालकाने डंपर मधील माल आव्हाळवाडी येथे उतरवला होता. तपासात काटे याने चालकाने डंपर घेऊन जाताना दारू पिली होती का नव्हती याबद्दल माहिती नसल्याचेही सांगितले.

यामध्ये पोलिसांनी सांगितले की, एकतर मालकाने मद्यपी डंपर चालकाला गाडी चालविण्यासाठी द्यायला नको होती. तसेच त्याला नोकरीवर ठेवताना गाडी चालविताना मद्य प्राषन करून गाडी चालवयची नाही असेही नोकरीवर ठेवण्यापूर्वी वारंवार सांगणे अपेक्षीत होते. त्यामुळे या प्रकरणी डंपर मालकाला अटक करण्यात आली. पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

नेमके प्रकरण काय?

पुण्यात रात्री  फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडले.  त्यापैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश असून जखमींपैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. वाघोलीच्या केसनंद नाका येथील पोलीस ठाण्यासमोर ही घटना घडली. 
पुण्यातील वाघोली येथील केसनांद फाट्यावर रात्री 12.30 च्या सुमारास हा अपघात झाला. डंपर चालक दारूच्या नशेत होता, अशी प्राथमिक माहिती आहे. ठार झालेल्यांमध्ये वैभव रितेश पवार (वय 2 वर्षे) आणि रिनेश नितेश पवार (वय 3 वर्षे) या दोन निष्पाप मुलांचा समावेश आहे, तर इतर 6 जण जखमी झाले आहेत. जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा: Pune Road Accident: धक्कादायक! पु्ण्यात फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडले

फूटपाथवर लोकांना चिरडून डंपर पुढे गेला

अपघातात जखमी झालेले सर्व मजूर आहेत. रविवारी (२२ डिसेंबर) रात्री ते अमरावतीहून कामानिमित्त आले होते. या पदपथावर एकूण 12 जण झोपले होते. बाकीचे लोक फूटपाथच्या बाजूला झोपडीत झोपले होते. भरधाव डंपर थेट फूटपाथवर जाऊन झोपलेल्या लोकांना चिरडले. आरडाओरडा ऐकू आल्यावर आजूबाजूचे लोक पीडितांना वाचवण्यासाठी धावले. यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.  अपघातानंतर डंपरचालक फरार झाला पण काही तासांतच पोलिसांच्या एका पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपी डंपर चालकाचे नाव गजानन शंकर तोट्रे, (26 वर्षे) असे असून तो मूळचा नांदेडचा रहिवासी आहे. तसेच त्याला बैद्यकीय तपासणीसाठीही पाठवण्यात आले आहे.

Web Title: Dumper crush 9 people at footpath vagholi police arrested driver and dumper owner pune crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 09:49 PM

Topics:  

  • Pune Crime

संबंधित बातम्या

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?
1

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

Ketan Agrawal Muder Case: दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा
2

Ketan Agrawal Muder Case: दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा

Ketan Agrawal Muder Case: हातात दारूची बाटली, सियाच्या मिठीत चेतन! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
3

Ketan Agrawal Muder Case: हातात दारूची बाटली, सियाच्या मिठीत चेतन! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Ketan Agrawal Muder Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड; चेतन चौधरीने लोहगडावर केलं सीन रिक्रिएशन, पुतळा दरीत ढकलला
4

Ketan Agrawal Muder Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड; चेतन चौधरीने लोहगडावर केलं सीन रिक्रिएशन, पुतळा दरीत ढकलला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.