Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रकचालकाला बेदम मारहाण करून जीव घेतला; दोन आरोपींना न्यायालयाचा मोठा दणका

बसच्या आरशाला ट्रकचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून ट्रकचालकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी दोघांना सत्र न्यायालयाने प्रत्येकी पाच वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 09, 2026 | 04:27 PM
ट्रकचालकाला बेदम मारहाण करून जीव घेतला; दोन आरोपींना न्यायालयाचा मोठा दणका

ट्रकचालकाला बेदम मारहाण करून जीव घेतला; दोन आरोपींना न्यायालयाचा मोठा दणका

Follow Us
Follow Us:
  • बसच्या आरशाला ट्रकचा धक्का लागल्याने वाद
  • मारहाणीत ट्रकचालक लालजी पाल यांचा मृत्यू.
  • दोन्ही आरोपींना ५ वर्षे सक्तमजुरी व ५ हजारांचा दंड
पुणे : बसच्या आरशाला ट्रकचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून ट्रकचालकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी दोघांना सत्र न्यायालयाने प्रत्येकी पाच वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. त्यांच्या मारहाणीत मृत ट्रकचालकाचे डोके सिमेंटच्या ठोकळ्यावर आदळल्याने अंतर्गत जखमा होऊन त्याचा मृत्यू झाला होता. अमोल मधुकर गाडेकर (वय ४०, रा. वारणे, सातारा) आणि अस्लम इक्बाल मुल्ला (वय ३१, रा. इचलकरंजी, कोल्हापूर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एम. भोसले यांनी हा निकाल दिला आहे.

 

ही घटना ३१ मे २०१८ रोजी रात्री कात्रज बोगद्याजवळील दरीपूल परिसरात घडली होती. याबाबत ट्रकमालक इब्राहिम सय्यद यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. मृत ट्रकचालक लालजी पाल यांच्या ट्रकचा आरोपींच्या ट्रॅव्हलर बसच्या आरशाला धक्का लागला होता. यावरून झालेल्या वादात आरोपींनी पाल यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. तसेच, त्यांचे डोके सिमेंटच्या ठोकळ्यावर आपटल्याने ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.

सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील नितीन कोंघे यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. घटनास्थळी पोहोचलेले पोलिस कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. मृत्यूपूर्वी पाल यांनी फिर्यादी आणि पोलिसांना दिलेली तोंडी माहिती न्यायालयाने मृत्यूपूर्व जबाब म्हणून ग्राह्य धरली. तर आरोपींचा खून करण्याचा पूर्वनियोजित हेतू नसल्याने न्यायालयाने खुनाऐवजी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोघांना दोषी ठरवले.

मृताचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळालेला असतानाही तपास अधिकाऱ्यांनी तो न्यायालयात सादर न केल्याने पोलिसांच्या कामावर न्यायालयाने ताशेरे ओढले. मात्र, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या साक्षीतून डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तपासातील त्रुटींचा फायदा आरोपींना देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : गुप्त माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! उरुळी कांचनमध्ये कल्याण क्लोज मटका जुगारावर छापा

बसच्या आरशाला धक्का लागणे हे मारहाणीचे कारण ठरू शकत नाही. आरोपींकडे कायदेशीर मार्ग उपलब्ध असतानाही त्यांनी हिंसक मार्ग स्वीकारला. अशा घटनांचे प्रमाण वाढत असल्याने आरोपींना कठोर शिक्षा सुनावणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद कोंघे यांनी केला. आरोपींचा खून करण्याचा हेतू नव्हता. तसेच त्यांच्यावर कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी आहे. या बाबी विचारात घेऊन न्यायालयाने त्यांना पाच वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रकचालकाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाने किती जणांना शिक्षा सुनावली?

    Ans: ट्रकचालकाला मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमोल गाडेकर आणि अस्लम मुल्ला या दोघांना सत्र न्यायालयाने प्रत्येकी पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

  • Que: ट्रकचालकाच्या मारहाणीचे नेमके कारण काय होते?

    Ans: ट्रकचालकाच्या मारहाणीचे नेमके कारण काय होते?

  • Que: न्यायालयाने आरोपींना कोणत्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले आणि काय शिक्षा दिली?

    Ans: आरोपींचा खून करण्याचा पूर्वनियोजित हेतू नसल्याने न्यायालयाने त्यांना खुनाऐवजी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले. दोघांना प्रत्येकी पाच वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Web Title: The court has handed down a severe sentence to two individuals who brutally assaulted a truck driver nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

गुप्त माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! उरुळी कांचनमध्ये कल्याण क्लोज मटका जुगारावर छापा
1

गुप्त माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! उरुळी कांचनमध्ये कल्याण क्लोज मटका जुगारावर छापा

बंदूक, चाकू अन् तलवारीचा धाक दाखवत शेतघरावर दरोडा! पोलिसांनी 24 तासांत केला गुन्ह्याचा उलगडा
2

बंदूक, चाकू अन् तलवारीचा धाक दाखवत शेतघरावर दरोडा! पोलिसांनी 24 तासांत केला गुन्ह्याचा उलगडा

आधी लोखंडी पाइप आणि विटांनी बेदम मारहाण, नंतर मृतदेह जाळला! छत्रपती संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
3

आधी लोखंडी पाइप आणि विटांनी बेदम मारहाण, नंतर मृतदेह जाळला! छत्रपती संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Sindhudurg Accident: “सणासुदीच्या दिवसांत घाला घातला…” दोडामार्गात अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन तरुण जागीच ठार; ओळखीचे काम सुरू!
4

Sindhudurg Accident: “सणासुदीच्या दिवसांत घाला घातला…” दोडामार्गात अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन तरुण जागीच ठार; ओळखीचे काम सुरू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.