Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Highway Accident: “भाऊबीजेला बहिणीला आणायला गेला अन् नियतीने गाठलं!” पेठ घाटात भीषण अपघात; ३३ वर्षीय भावाचा जागीच मृत्यू

Highway Accident: भाऊबीजेच्या सणाला बहिणीला घरी आणण्यासाठी गेलेल्या भावावर काळाने घातला झडप! पुणे-नाशिक महामार्गावरील पेठ घाटात भरधाव अज्ञात गाडीची मागून धडक; नवविवाहित भावाचा जागीच दुर्दैवी अंत, बहीण-भाचा थोडक्यात बचावले...

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 10, 2026 | 03:06 PM
Highway Accident: "भाऊबीजेला बहिणीला आणायला गेला अन् नियतीने गाठलं!" पेठ घाटात भीषण अपघात; ३३ वर्षीय भावाचा जागीच मृत्यू

Highway Accident: "भाऊबीजेला बहिणीला आणायला गेला अन् नियतीने गाठलं!" पेठ घाटात भीषण अपघात; ३३ वर्षीय भावाचा जागीच मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • पेठ घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
  • भाऊबीजेसाठी बहिणीला आणत असताना अपघात; बहीण-भाचा जखमी
  • अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
Highway Accident: भाऊबीजेच्या पवित्र सणाच्या दिवशीच एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील पेठ (ता. आंबेगाव) येथील घाट रस्त्यावर मोटारसायकलला अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ३३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. विक्रांत गोपीनाथ मेहेर (रा. वारूळवाडी, ता. जुन्नर) असे दुर्दैवी मृत भावाचे नाव आहे. या घटनेत त्यांची बहीण आणि भाचा किरकोळ जखमी झाले आहेत.

हेही वाचा: Drowning Case: पोलिसांची गाडी पाहून तलावात मारल्या उड्या? ३ तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू; एकाची झुंज सुरू, चौकशीचे आदेश!

भाऊबीजेचा आनंद क्षणात ओसरला

मिळालेल्या माहितीनुसार, वारूळवाडी येथील रहिवासी असलेले विक्रांत मेहेर हे पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरीला होते. बुधवारी भाऊबीजेचा सण असल्याने ते आपल्या बहिणीला (गायत्री सोनवणे) भाऊबीजेसाठी आणण्यासाठी खेड येथे गेले होते. बहिणीला आणि चिमुकल्या भाच्याला मोटारसायकलवर (एमएच १४) बसवून ते आनंदाने वारूळवाडीच्या दिशेने निघाले होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पेठ घाटातील रस्त्यावरून जात असताना, एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली.

एकुलता एक मुलगा गमावला; वारूळवाडीवर शोककळा

हा अपघात इतका भीषण होता की, विक्रांत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सुदैवाने या अपघातात बहीण गायत्री आणि भाचा किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. मृत विक्रांत यांचे वडील गोपीनाथ मेहेर यांचा वारूळवाडी येथे वेल्डिंगचा व्यवसाय आहे. त्यांना विक्रांत व गायत्री ही दोन विवाहित मुले होती. विशेष म्हणजे, विक्रांत यांचा नुकताच विवाह झाला होता.

भाऊबीजेच्या दिवशीच कुटुंबातील एकुलत्या एक तरुण मुलाचा असा अचानक आणि दुर्दैवी अंत झाल्याने मेहेर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच वारूळवाडी आणि परिसरात अत्यंत शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी मंचर/पारगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा: Doctor Assault News: “उपचारात निष्काळजीपणाचा आरोप करत रुग्णालयाची तोडफोड!” डॉक्टर अन् सुरक्षा रक्षक रक्तबंबाळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा अपघात कुठे आणि कसा घडला?

    Ans: पुणे-नाशिक महामार्गावरील पेठ (ता. आंबेगाव) येथील घाट रस्त्यावर अज्ञात वाहनाने मोटारसायकलला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला.

  • Que: अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: विक्रांत गोपीनाथ मेहेर (वय ३३, रा. वारूळवाडी, ता. जुन्नर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

  • Que: अपघाताच्या वेळी गाडीवर कोण कोण प्रवास करत होते?

    Ans: विक्रांत मेहेर यांच्यासोबत त्यांची बहीण गायत्री सोनवणे आणि त्यांचा भाचा प्रवास करत होते, जे या अपघातात किरकोळ जखमी झाले.

Web Title: Pune nashik highway peth ghat accident brother death bhaubeej junnar sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Accident Death
  • highway news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

कात्रज चौकात भीषण अपघात! रस्ता ओलांडणाऱ्या दोन तरुणांना पीएमपी बसने उडवले; एकाचा मृत्यू
1

कात्रज चौकात भीषण अपघात! रस्ता ओलांडणाऱ्या दोन तरुणांना पीएमपी बसने उडवले; एकाचा मृत्यू

ट्रकचालकाला बेदम मारहाण करून जीव घेतला; दोन आरोपींना न्यायालयाचा मोठा दणका
2

ट्रकचालकाला बेदम मारहाण करून जीव घेतला; दोन आरोपींना न्यायालयाचा मोठा दणका

Bus Accident: “पिशवीत सापडलेल्या टाचण्या, लिंबू अन् सिमकार्ड…” नाशिकच्या द्वारका चौकातील काळजाचा ठोका चुकवणारा अपघात…
3

Bus Accident: “पिशवीत सापडलेल्या टाचण्या, लिंबू अन् सिमकार्ड…” नाशिकच्या द्वारका चौकातील काळजाचा ठोका चुकवणारा अपघात…

Highway Accident: “मदतीचा हात ठरला काळ!” रस्त्यात रडणाऱ्या महिलेला धीर देण्यासाठी थांबलेल्या तरुणाचा भरधाव टेम्पोच्या धडकेत…
4

Highway Accident: “मदतीचा हात ठरला काळ!” रस्त्यात रडणाऱ्या महिलेला धीर देण्यासाठी थांबलेल्या तरुणाचा भरधाव टेम्पोच्या धडकेत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.