टाकळी हाजीत महिलेला कुऱ्हाड व फावड्याने मारहाण; 'त्या' महिला शेतात आल्या अन्...
शिरपूर जैन : वाशिमच्या शेलगाव बगाडे येथे दोन भावांच्या झटापटीत लहान भाऊ विहिरीत पडला. यामध्ये धाकट्या भावाच्या त्याच्या छातीला मुक्का मार लागला. त्याची प्रकृती बिघडली आहे. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी मोठ्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेदेखील वाचा : Dhule News: प्रेम प्रकरणातून तरुणाची बेदम मारहाण, मग निर्घृण हत्या; फेकून दिले नाल्यात, शिरपूर तालुका हादरला
शेलगाव बगाडे येथील रहिवासी जन्मदास भिवसेन साळुंके (वय 56) यांनी शुक्रवारी (दि. 21) शिरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांचा मोठा भाऊ देविदास भिवसेन साळुंके (60) याला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्याने शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता शेताचा धुरा पेटविला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यात देविदास हा जन्मदास याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. त्यानंतर जन्मदास शेतातील विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेला असता पाठीमागून मोठा भाऊ देविदास आला व त्याच्या हातातील काठीने मारहाण केली. यावेळी दोघा भावांची झटापट झाली. या झटापटीत लहान भाऊ जन्मदास विहिरीत पडला.
विहिरीत पडल्यानंतर त्याने जोरजोरात आरडाओरड केली. त्याच्या आवाज ऐकून त्याची पत्नी तेथे आली. तेव्हा त्याचा मोठा भाऊ देविदास तेथून पळून गेला. त्यानंतर जन्मदास याला विहिरीतून बाहेर काढले. त्याच्या छातीला मुक्का मार लागला होता. यासाठी त्याला उपचारासाठी वाशिम येथे पाठविण्यात आले होते.
थोरल्या भावाविरोधात गुन्हा दाखल
जन्मदास भिवसेन साळुंके यांच्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी त्यांचा मोठा भाऊ देविदास भिवसेन साळुंके (रा. शेलगाव बगाडे) याच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलिस हेडकॉन्स्टेबल अनिल कातडे करत आहेत.
हेदेखील वाचा : Champions Trophy 2025 : हेनरिक क्लासेनच्या जागेवर आलेल्या रियान रिकल्टनची शानदार शतकी खेळी; चॅम्पियन्स ट्रॉफीत फलंदाजांचा बोलबाला