Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूर कारागृहात कैद्यांमध्ये पुन्हा राडा; तुरुंगातच एकाने दुसऱ्या कैद्याला दिली जीवे मारण्याची धमकी…

विशेष म्हणजे भांडण करणारे दोघे आणि दादागिरी करणारा असे तिघेही विचाराधीन कैदी आहेत. आरोपी प्रवीण हा पुण्यातील चर्चित गुंड आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 12, 2025 | 12:16 PM
नागपूर कारागृहात कैद्यांमध्ये पुन्हा राडा; तुरुंगातच एकाने दुसऱ्या कैद्याला दिली जीवे मारण्याची धमकी...

नागपूर कारागृहात कैद्यांमध्ये पुन्हा राडा; तुरुंगातच एकाने दुसऱ्या कैद्याला दिली जीवे मारण्याची धमकी...

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : पाणी भरण्यावरून दोन कैद्यांमध्ये वाद सुरू होता. नेमकं याचदरम्यान तिसऱ्याच एका कैद्याची ‘एंट्री’ झाली. सिनेस्टाईल त्याने दादागिरी दाखवत एकाची बाजू घेत दुसऱ्या कैद्याला बेदम मारहाण केली. तसेच त्याला ठार मारण्याची धमकी दिली. कर्तव्यावर असलेले कारागृह रक्षक धावले. मध्यस्थी करून वाद सोडवला. ही घटना नागपूर कारागृहातील बडी गोल बरॅक एकच्या मागच्या भागात घडली.

याप्रकरणी आता धंतोली पोलिसांनी कारागृह रक्षक अमोल इखारकर यांच्या तक्रारीवरून दादागिरी करणाऱ्या कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रवीण श्रीनिवास महाजन (वय ३७, रा. कसबापेठ, पुणे) असे त्या कैद्याचे नाव आहे. विशेष म्हणजे भांडण करणारे दोघे आणि दादागिरी करणारा असे तिघेही विचाराधीन कैदी आहेत. आरोपी प्रवीण हा पुण्यातील चर्चित गुंड आहे. 2021 मध्ये त्याने पुण्याच्या बुधवारपेठेत एका पोलिसावर चाकूने हल्ला करत त्याचा खून केला होता. त्यावेळी प्रविण तडीपार होता. याच वर्षी त्याला नागपूरच्या कारागृहात ठेवण्यात आले आहे.

हेदेखील वाचा : Dhule Crime: दोन दिवसांपूर्वी वाढदिवस आणि…, माजी स्थायी समिती सभापतींच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल

दरम्यान, यशपाल नानकचंद चौहान हा बडी गोल क्रमांक १ च्या मागच्या भागातील नळावर बादलीने पाणी भरत होता. त्याच वेळी तोसिफ इब्राहिम शेख (रा. ताजबाग) हा नळावर गेला आणि यशपालची बादली बाजूला करुन त्याने स्वतःची बादली नळाखाली लावली. यावरून यशपाल आणि तोसिफ यांच्यात वाद झाला. दोघेही एकमेकांना शिवीगाळ करत होते.

काही दिवसांपूर्वीही घडली होती अशीच घटना

गेल्या मंगळवारीही मध्यवर्ती कारागृहात अशाच प्रकारची घटना घडली होती. दोन कैद्यांमध्ये क्षुल्लक कारणातून वाद झाला होता. यात एका कैद्याने शस्त्राने हल्ला करत दुसऱ्या कैद्याला गंभीर जखमी केले होते. ही घटना बरॅक क्र. २ जवळ घडली होती. त्यानंतर आता ही घटना समोर आली.

हेदेखील वाचा : Hyderabad Crime : कुकरने मारलं, चाकू कैचीने गळा चिरून महिलेवर…; हल्लेखोरांनी 40 ग्रॅम सोनं आणि 1 लाख रुपये रोख रक्कम लुटली

Web Title: Fight breaks out between prisoners in nagpur jail one prisoner threatens to kill another in the jail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 12:16 PM

Topics:  

  • crime news
  • Nagpur News

संबंधित बातम्या

धक्कादायक! घरात डांबून ठेवले, जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त; महिलेचे सासरच्या लोकांवर आरोप
1

धक्कादायक! घरात डांबून ठेवले, जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त; महिलेचे सासरच्या लोकांवर आरोप

Crime News Live Updates : कणकवली हादरली! मुलाने आईच्या डोक्यात कोयत्याने केले सपासप वार
2

Crime News Live Updates : कणकवली हादरली! मुलाने आईच्या डोक्यात कोयत्याने केले सपासप वार

माण तालुका हादरला! डोक्यात दगड घालून वृद्ध महिलेचा खून; कारण…
3

माण तालुका हादरला! डोक्यात दगड घालून वृद्ध महिलेचा खून; कारण…

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय हत्या; RJD नेत्यावर थेट झाडल्या सहा गोळ्या, परिसरात एकच खळबळ
4

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय हत्या; RJD नेत्यावर थेट झाडल्या सहा गोळ्या, परिसरात एकच खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.