Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

’15 हजार रुपये द्या, नाहीतर पाहणी करून काम बेकायदेशीर दाखवू’; अपर जिल्हाधिकाऱ्यानेच मागितली लाच

अपर जिल्हाधिकाऱ्यासारख्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली. प्रमोद गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या अपर जिल्हाधिकाऱ्याचे नाव आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 15, 2026 | 08:01 AM
CGST अधीक्षकाने मागितली 1 कोटीची लाच; 24 फ्लॅट्सचा ताबा देण्यासाठी...

CGST अधीक्षकाने मागितली 1 कोटीची लाच; 24 फ्लॅट्सचा ताबा देण्यासाठी...

Follow Us
Follow Us:

अकोला : स्टोन क्रशर सुरू ठेवण्यासाठी अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी १५ हजारांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपावरूनच येथील अपर जिल्हाधिकाऱ्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाने तक्रार केली होती.

अपर जिल्हाधिकाऱ्यासारख्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली. प्रमोद गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या अपर जिल्हाधिकाऱ्याचे नाव आहे. अकोला जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात सामूहिकपणे तक्रार दिली होती. यावेळी पुरावा म्हणून अधिकाऱ्यांच्या संभाषणाची क्लिप पोलिसांना दिली होती. तक्रारीनुसार, संघाचे कार्याध्यक्ष विवेक बिजवे यांचे क्रशर पाँईंट आहे. त्यांना अपर जिल्हाधिकारी गायकवाड यांनी फोन केला.

‘तुमच्याकडून १५ हजार आणि संघटनेतील अन्य प्रत्येक सदस्याकडून प्रति महिना पैसे द्या. पैसे न दिल्यास खाण व क्रशरच्या ठिकाणाची पाहणी करून तुमचे कामकाज बेकायदेशीर असल्याचे दाखवून ते बंद करेल’, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या शासकीय निवास्थानी जाऊन १५ हजार रुपये दिले. त्यांनी पुन्हा अन्य सदस्यांकडून १५ हजार रुपये गोळा करून द्यावे; अन्यथा कारवाई करु, अशी धमकी दिल्याचे बिजवे यांचे म्हणणे आहे.

गायकवाड यांनी आरोप फेटाळले

तक्रार दिल्यानंतर ९ दिवसानंतर अपर जिल्हाधिकारी गायकवाड यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, गायकवाड यांनी आपल्या विरोधातील सर्व आरोप यापूर्वीच फेटाळले असून आरोप, निराधार असल्याचा दावा केला आहे.

दोन हजारांच्या लाचप्रकरणी कर्मचारी अटकेत

राज्यासह देशभरात कर्मचारी, अधिकारी यांनी लाच घेतल्याचे अनेक प्रकरण उघडकीस आले आहेत. लाच घेण्याचे प्रकार वाढत असल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जोरदार कारवाई केली जात आहे. अशातच आता तक्रार अर्जाची चौकशी करुन वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या शिरुर तालुक्यातील कान्हूरमेसाई ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा : रुपाली चाकणकरांच्या बहिणीचे ‘भोंदूबाबा’ कनेक्शन उघड! पतसंस्थेतील खात्यातून ४० ते ५० कोटींचे संशयास्पद व्यवहार

Web Title: Fir registered against akola additional collector pramod gaikwad for demanding bribe of 15000

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 07:56 AM

Topics:  

  • akola news
  • Bribe Case

संबंधित बातम्या

काटेपूर्णा अजूनही तहानलेले; साठा 22.64 टक्के, जलसाठ्यात वाढीची प्रतीक्षाच
1

काटेपूर्णा अजूनही तहानलेले; साठा 22.64 टक्के, जलसाठ्यात वाढीची प्रतीक्षाच

Farmers Issue : शेतकऱ्यांचे 5 महिन्यांचे अनुदान रखडलेलेच; APL कार्डधारक त्रस्त
2

Farmers Issue : शेतकऱ्यांचे 5 महिन्यांचे अनुदान रखडलेलेच; APL कार्डधारक त्रस्त

मोठी बातमी ! कागदी शिधापत्रिका होणार आता इतिहासजमा; 1 लाख शिधापत्रिका ‘ऑनलाईन’
3

मोठी बातमी ! कागदी शिधापत्रिका होणार आता इतिहासजमा; 1 लाख शिधापत्रिका ‘ऑनलाईन’

पोपटखेड पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना…
4

पोपटखेड पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.