मुंबई: राज्यातील किनापट्टी भागातून एक हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. राज्याच्या सागरी हद्दीत चीनची तब्बल ६०० अवाढव्य फॅक्ट्री जहाजे घुसल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे तर इतर राज्यातील मच्छीमार बोटींनीही राज्यातील सागरी हद्दीत प्रवेश केला आहे. या जहाजांच्या माध्यमातून गेल्या महिनाभरात महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या हक्काची लाखो टन मासळीची लूट सुरू आहे. यामुळए स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेला मोठा धोका निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रातील कायद्यानुसार, महाराष्ट्रातील सागरी हद्दीत परदेशी आणि परप्रांतीय जहाजांना मासेमारी करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पण त्यानंतरही हा कायदा झुगारून गुजरात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि गोवा सारख्या राज्यांतील शेकडो मच्छीमार बोटींनी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीपणे घुसखोरी केली आहे. या राज्यांची जहाजे महाराष्ट्राच्या हद्दीत घुसखोरी करून महाराष्ट्रातील हद्दींमध्ये मच्छिमारी करत आहेत.
चार वर्षात कोट्यवधींचा टर्नओव्हर! अगदी २६ वर्षात उभे केले कोट्यवधींचे साम्राज्य
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत परराज्यांमधून आलेल्या तब्बल ४२७ हॉर्सपॉवर क्षमतेच्या अनेक मासेमारी बोटी मोठ्या प्रमाणावर मासेमारी करत असल्याचे समोर आले आहे. मालवण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि जयगड या भागांत या बोटी सर्रास मासेमारी करून लाखो टन मासळी लुटल्या जात आहे. या बेकायदेशीर मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, लुटल्या जाणाऱ्या मासळीची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचते, असे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रामधील मच्छीमार व्यवसाय आधीच अडचणींचा सामना करत असताना गेल्या काही महिन्यात आलेल्या वादळे, जोरदार पाऊस, वारे, खराब हवामानामुळे अनेक दिवस मासेमारी बंद ठेवण्यात आली होती. त्यातच आता स्थानिक मच्छीमारांसमोर या बेकायदेशीर मासेमारीचे आव्हान उभं राहिलं आहे. त्यात चिनी आणि परप्रांतीय मच्छीमार जहाजांचाही त्रासही सहन करावा लागत आहे. यामुळे स्थानिक मच्छीमारांना मोठ्या आर्थिक नुकसानीचाही सामना करावा लागत आहे.
अनेक राज्यांमध्ये भीषण पुरस्थिती अन् PM Narendra Modi ॲक्शन मोडमध्ये; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
चीनमधील हजारो टन क्षमतेची 500 ते 600 प्रचंड फॅक्टरी जहाजं राज्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करत आहेत. 200 सागरी नॉटिकल मैलांच्या आत 50 ते 100 मीटर लांबीची आणि हजारो टन साठवणुकीची क्षमता असलेली ही मारेमारी करणारी जहाजं ओळखणं नौदलासाठीसुद्धा अवघड ठरतं. अनेक वेळा चीनची जहाजं रंगेहात पकडली गेली तरी त्यांना कोणत्या कारणांवरून सोडून दिलं जातं, हे अजूनही एक गूढच राहिलं आहे.
चिनी बोटी व्हेसल ट्रॅकरवर स्पष्टपणे दिसत आहेत, तरीही त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही. या बोटींमधून स्थलांतरित मशांची मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जात असल्याने स्थानिक मच्छीमारांना प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचा आरोप स्थानिक मच्छीमारांनी केला आहे.
महाराष्ट्राला सुमारे ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. हा किनारा प्रामुख्याने कोकण किनारपट्टी म्हणून ओळखला जातो. यात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी रत्नागिरी जिल्ह्याचा किनारा सर्वाधिक लांब, तर मुंबईचा किनारा सर्वात लहान आहे.