Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने पाच जणांना तब्बल 50 लाखांना गंडा; नोकरीचे बनावट पत्र दिले अन् नंतर…

दुसऱ्या घटनेत जेलरोड येथील श्रीकांत रमेश पाटील व त्यांचा लहान भाऊ या दोघांना ऑगस्ट २०२० मध्ये रेल्वेत नोकरीचे बनावट पत्र दिले व त्यापोटी १६ लाख, ५० हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 18, 2025 | 09:53 AM
सवलतीच्या आमिषाने शेकडो नागरिकांना लाखोंचा गंडा; संतप्त नागरिकांनी अखेर दुकानाचे कुलूपच तोडले अन्...

सवलतीच्या आमिषाने शेकडो नागरिकांना लाखोंचा गंडा; संतप्त नागरिकांनी अखेर दुकानाचे कुलूपच तोडले अन्...

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : भारतीय रेल्वेत विविध पदांवर नोकरी लावून देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून पाच जणांची फसवणूक करण्यात आली. या पाच जणांना सेंट्रल रेल्वेचे नोकरी लागल्याचे बनावट जॉईन पत्र देऊन नाशिकरोडच्या दोघांनी सुमारे 50 लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. गुन्ह्याची व्याप्ती पाहता फसवणूक झालेल्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी देवळाली कॅम्प येथील संतोष चंद्रकांत कटारे, संतोष शिवराम गायकवाड या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयितांनी २०२२ ते २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीत नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांना हेरून त्यांना रेल्वेच्या विविध पदांवर नोकरी देण्यासाठी पैसे गोळा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सख्ख्या भावांना साडेसोळा लाखांना फसवले

दुसऱ्या घटनेत जेलरोड येथील श्रीकांत रमेश पाटील व त्यांचा लहान भाऊ या दोघांना ऑगस्ट २०२० मध्ये रेल्वेत नोकरीचे बनावट पत्र दिले व त्यापोटी १६ लाख, ५० हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे. तिसऱ्या घटनेत उपनगर येथील मयुर कांबळे यास ऑगस्ट २०२२ मध्ये मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपली ओळख असून, त्याचे पुरावे म्हणून विविध अधिकाऱ्यांसोबतचे छायाचित्रे दाखवून आपण बऱ्याच मुलांना रेल्वेत नोकरी लावून दिल्याचे सांगितले.

वैद्यकीय तपासणीचे बनावट पत्रही दिले

मयुर कांबळे, त्याचा भाऊ अशा दोघांना मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील बनावट वैद्यकीय तपासणीचे पत्र दिले. तसेच मुंबईतील सीएसटी रेल्वेच्या एका कार्यालयात नेले. तेथे रेल्वे नोकरीचे जॉईन होण्याचे पत्र दिले. प्रत्यक्षात कांबळे यांनी रेल्वेशी संपर्क साधला असता सदरची कागदपत्रे बनावट असल्याचे त्यांनी सांगितले. या मोबदल्यात आरोपींनी त्याच्याकडून १४ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या तिन्ही घटनेत देवळाली कॅम्प पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भारत सरकारची राजमुद्रा असलेले पत्रही तयार

जेलरोड येथे राहणारे सोनवणे यांची बहिण संगिता हीस रेल्वेच्या सी ग्रुपमध्ये तर फिर्यादीचा मामा चेतन वानखेडे यास ग्रुप डीमध्ये नोकरी लावून देण्यासाठी भारत सरकारची राजमुद्रा असलेले पत्र तयार केले. त्यावर ‘मिनिस्ट्री ऑफ रेल्वे’चा बनावट शिक्का मारून पर्सनल असिस्टंट यांची स्वाक्षरीचे पत्र दिले. या दोघांकडून १९ लाख, ५० हजाराची रक्कम घेतली. प्रत्यक्षात उमेदवारांनी चौकशी केली असता, सदरचे पत्र बनावट असल्याचे आढळून आले आहे.

हेदेखील वाचा : नोकरीच्या आमिषाने मामेभावालाच गंडा; तब्बल 12 लाखांची केली फसवणूक

Web Title: Five people were duped of rs 50 lakhs by luring them with jobs in the railways

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 09:51 AM

Topics:  

  • Fraud Case
  • Job Promise
  • Nashik News

संबंधित बातम्या

Tapovan News : टिल्लू-लेव्हल बुद्धीत! नाशिकच्या तपोवनावरुन पेटलं रान; राणेंवर शिवसेनेचा प्रहार
1

Tapovan News : टिल्लू-लेव्हल बुद्धीत! नाशिकच्या तपोवनावरुन पेटलं रान; राणेंवर शिवसेनेचा प्रहार

‘ईदच्या वेळी बकरी कापण्याला…’; तपोवन वृक्षतोडीच्या प्रकरणावर नितेश राणेंचे वादग्रस्त विधान
2

‘ईदच्या वेळी बकरी कापण्याला…’; तपोवन वृक्षतोडीच्या प्रकरणावर नितेश राणेंचे वादग्रस्त विधान

Tapovan Case : नाशिकच्या तपोवन वृक्षतोडी वरुन पेटलं रान! सयाजी शिंदेंनी काढले सरकारचे वाभाडे
3

Tapovan Case : नाशिकच्या तपोवन वृक्षतोडी वरुन पेटलं रान! सयाजी शिंदेंनी काढले सरकारचे वाभाडे

धक्कदायक ! व्यापाऱ्याला 2.8 कोटींचा गंडा; लाल दिव्याच्या गाडीने पोहोचला घरी अन्…
4

धक्कदायक ! व्यापाऱ्याला 2.8 कोटींचा गंडा; लाल दिव्याच्या गाडीने पोहोचला घरी अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.