crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
धुळे शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती सोनल शिंदे यांचा मुलगा विराज शिंदे याने आयुष्य संपवल्याचं समोर आलं आहे. त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्याचा वाढदिवस (9 सप्टेंबर) मंगळवारी साजरा करण्यात आला. त्याच्या दोन दिवसांनी त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली असून, शहरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
प्राथमिक माहितीनुसार, विराज गुरुवारी एकटा होता. त्याचे कुटुंबीय बाहेर गेले होते. त्यावेळी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना हे दिसलं. त्यांनी तात्काळ विराजला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याचा मृत्यू आधीच झाल्याचे घोषित केले.
पोलीस तपास सुरु ?
विराजने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेचा अधिक तपास सुरु केला आहे. आत्महत्येचा कारण काय असू शकतं हे शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेने धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मद्यधुंद अवस्थेत पोलिसांच्या गाडीला धडक, एवढेच नाही तर २ पोलिसांना मारहाण केली
दरम्यान, धुळे येथून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. भर रस्त्यात सर्वांसमोर दोन पोलिसांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. धुळे शहरातील पाच कंदील परिसरामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पोलिसांना मारताना एक तरुण दिसत आहे.
नेमकं काय घडलं?
धुळे शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सतीश फुलपगारे आणि दीपक सैंगदाणे हे पेट्रोलिंग करत होते. त्याचवेळी त्यांनी पोलीस गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली होती. याच वेळी एक गाडी भरधाव वेगात आली. आणि त्या गाडीने पोलिसांच्या गाडीला धडक दिली. धडक देणारा आरोपी याचा नाव सोपान पाटील हा गाडी चालवत होता. सोपान हा साडगाव येथील रहिवासी आहे. शिवाय तो मध्यधुंद अवस्थेत होता. त्याच स्थितीत त्याने गाडीला जोरदार धडक दिली.
त्यानंतर त्याला जाब विचारण्यासाठी पोलीस त्याच्या दिशेने धावले. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सोपान पाटील याने कुठलाही विचार न करता सतीश फुलपगारे व दीपक शेंगदाणे या दोघा पोलीस हवालदारांना शिवीगाळ केली. एवढंच नाही तर त्याने त्या दोघांच्या अंगावरही हात घातला. दोघांच्या ही कानशिलात त्याने लगावली. तिथे असलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडीओ काढला.
Crime News: मुंबईत घातपाताचा कट! दिल्ली पोलिसांनी उधळला डाव, ISISचे दोन दहशतवादी अटकेत