Pune Crime News: पुण्यात एकाच दिवशी चार घरफोड्या; साडे आठ लाखांचा ऐवज लंपास
फुरसूंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भेकराईनगर परिसरात श्रेयस टायर्सचे दुकान चोरट्यांनी फोडत दिड लाखांची रोकड चोरी केली. याबाबत तानाजी ढवळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून फुरसूंगी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Crime News Pune: घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी चारच फ्लॅट फोडून तब्बल साडे आठ लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. शहरात घरफोड्यांचे सत्र कायम असल्याचे दिसत असून, चार फ्लॅट भारती विद्यापीठ, चतुश्रृंगी आणि फुरसुंगीत या घटना घडलेल्या आहेत. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पहिली घटना कात्रज येथील मांगडेवाडीत घडली असून, याप्रकरणी सोमनाथ मुधळे (वय ३२) यांनी तक्रार दिली आहे. ते काही कामानिमित्त २ ते ४ ऑगस्टदरम्यान घराला कुलूप लावून गेले होते. यादरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, घरातील २ लाख ८० हजार रुपयांचे दागिणे चोरी केले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुसर्या घटनेत गणेशखिंड येथील एका कॉलनीत चोरी झाली आहे. चोरट्यांनी महिलेचा बंद फ्लॅट फोडत ३ लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. याबाबत लिलावती गिते (वय ४५) यांनी चतुश्रृंगी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. चार ऑगस्ट रोजी भरदिवसा ही चोरी झाली असून, दाराच्या शेजारील शूज रॅकेटमध्ये ठेवलेल्या चावीने त्यांच्या घराचे कुलूप उघडून चोरट्यांनी चोरी केली आहे. काही तासांसाठी त्या घर बंदकरून गेल्यानंतर चोरट्यांनी चोरी केली.
तसेच तिसरी घटना फुरसूंगी येथे घडील असून, याबाबत अरविंद गायकवाड (वय ३७) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून फुरसूंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार २ ते ३ ऑगस्टच्या दरम्यान बाहेरगावी गेले होते. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून घरातील ७८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरला. त्यासोबतच त्यांच्या शेजारील गणेश बारवकर यांचा देखील फ्लॅट फोडून चोरी करण्यात आली आहे. मात्र, त्यामधून चोरी नेमकी किती झाली हे समजू शकलेले नाही.
फुरसूंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भेकराईनगर परिसरात श्रेयस टायर्सचे दुकान चोरट्यांनी फोडत दिड लाखांची रोकड चोरी केली. याबाबत तानाजी ढवळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून फुरसूंगी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ४ ते ५ ऑगस्ट दरम्यान ही घटना घडली आहे. चोरट्यांनी दुकानावरील पत्रा उचकटून आत प्रवेश केला. नंतर टेबलाच्या ड्रॉव्हरमधील रोकड चोरी करून पोबारा केला. दरम्यान, फुरसूंगी पोलिस ठाण्याच्या काही मिटर अंतरावरच सलग आठ दुकाने फोडली होती. त्यामुळे चोरट्यांच्या मनात पोलिसांची भिती नसल्याचेच यावरून स्पष्ट होत आहे.
Web Title: Four house burglaries in a single day in pune property worth eight and a half lakhs looted