फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाईल मार्केट जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारांपैकी एक मानला जातो. विविध सेगमेंटमध्ये स्पर्धात्मक किंमतीत बेस्ट फीचर्स देणाऱ्या कार्समुळे ग्राहकांची पसंती अनेक ब्रँड्सकडे वळताना दिसते. यामध्ये ह्युंदाई ही एक आघाडीची परदेशी कंपनी आहे जिला भारतीय ग्राहकांचा मोठा विश्वास लाभला आहे.
ह्युंदाईच्या कार स्टाइल, परफॉर्मन्स, मायलेज आणि आधुनिक फीचर्ससाठी ओळखल्या जातात. SUV पासून हॅचबॅकपर्यंत ह्युंदाईने विविध प्रकारांच्या कार्स उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्राहकांची वाढती मागणी आणि बदलते ट्रेंड लक्षात घेता, ह्युंदाईसह इतर अनेक विदेशी कंपन्या भारतीय मार्केटमध्ये आपले उत्पादन सादर करत आहेत, जे या क्षेत्राच्या प्रगतीस चालना देत आहे.
साऊथ कोरियाची वाहन निर्माता कंपनी ह्युंदाईने देशात अनेक दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर केल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, ह्युंदाई लवकरच भारतात त्यांचा लक्झरी ब्रँड जेनेसिस लाँच करू शकते. ह्युंदाईने या ब्रँडबद्दल काय माहिती दिली आहे? हा ब्रँड भारतात कधीपर्यंत आणता येईल? या ब्रँड अंतर्गत कोणत्या कार लाँच केल्या जाऊ शकतात? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
कमी किंमत… स्मार्ट फीचर्स! Tata Harrier आणि Safari अॅडव्हेंचर X व्हेरिएंट लाँच, काय आहे किंमत?
ह्युंदाई मोटर्स लवकरच भारतीय बाजारपेठेत जेनेसिस ब्रँड सादर करणार आहे. हा ह्युंदाईचा लक्झरी ब्रँड आहे आणि पुढील काही महिन्यांत तो भारतात लाँच केला जाऊ शकतो.
कंपनीने माहिती दिली आहे की ते भारतात जेनेसिस लाँच करण्याचा विचार करत आहेत. भारतातील ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन याबाबत कोणताही निर्णय घेतला जाईल.
कंपनीने अद्याप यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. परंतु जर जेनेसिस भारतात लाँच झाले तर त्यांच्या एसयूव्ही सेगमेंटच्या कार प्रथम भारतात आणल्या जाऊ शकतात अशी अपेक्षा आहे. ज्यामध्ये GV80 Coupe, GV80, GV70 सारख्या एसयूव्हीचा समावेश आहे.
ह्युंदाई भारतात 50-60 लाख रुपयांच्या सेगमेंटमध्ये विक्रीसाठी वाहने उपलब्ध करून देते. परंतु जेनेसिस ब्रँड हा ह्युंदाईचा लक्झरी ब्रँड आहे. त्यामुळे या ब्रँडसोबत येणाऱ्या एसयूव्ही 50 लाखांच्या आसपास किंवा त्याहून अधिक किमतीच्या सेगमेंटमध्ये देऊ शकतात. भारतात या ब्रँडची मुख्य स्पर्धा बीएमडब्ल्यू, ऑडी, मर्सिडीज, व्होल्वो सारख्या लक्झरी ब्रँडशी असेल.