crime (फोटो सौजन्य: social media )
गडचिरोली: गडचिरोलीत नक्षलवाद्यां विरोधात मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून गडचिरोलीत चार नस्खलवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यात तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. यावेळी पोलिसांना शस्त्रसाठा सापडला असून अजूनही चकमक सुरु आहे. ही कारवाई भामरागड तालुक्यातील कोपर्शीच्या जंगलात सुरु आहे.
Crime News: दूर जाऊन सिगारेट प्या म्हणताच युवकांना राग आला अन्…: कामगारांसोबत नेमके काय घडले?
नेमकं काय घडलं?
गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाचे गट्टा दलम, कंपनी क्रमांक 10 व इतर माओवादी दबा धरून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक अभियान एम. रमेश यांचे नेतृत्वाखाली C-60 ची 19 पथके आणि CRPF QAT ची 02 पथके जंगल परिसरात रवाना करण्यात आली होती. यावेळी या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता.
प्रचंड पाऊस असल्याने दोन दिवसांनंतर पोलीस पथके आज सकाळी या जंगल परिसरात पोहोचले. त्यानंतर त्यांनी शोध मोहीम राबवली. त्याच वेळी माओवाद्यांनी पोलीस पथकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. ज्याला पोलीस पथकाने प्रभावी प्रत्युत्तर दिले. जवळपास आठ तास ही चकमक चालली. त्यानंतर शोध मोहिम राबवली गेली. त्यात 4 जहाल माओवाद्यांचे मृतदेह सापडले. त्यात 1 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश होता.
यावेळी घटनास्थळावरून 01 SLR रायफल, 02 INSAS रायफल व 303 रायफल जप्त करण्यात आले आहेत. या भागात उर्वरित माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी माओवाद विरोधी अभियान सुरू आहे. गडचिरोली पोलिसांना राहवलेलं हे अभियान यशस्वी झाले. शिवाय त्यांना मिळालेली गुप्त माहिती ही खरी ठरली. त्यामुळे चार जहाल नक्षलवाद्यांचा खात्म करण्यात सुरक्षा दलाला यश मिळालं आहे. दरम्यान या ठिकाणी अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे.
संतापजनक! तीन अल्पवयीन मुलींसमोर अश्लील कृत्य, आरोपी अटकेत
मुंबईतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. तीन अल्पवयीन मुलींसमोर अश्लील कृत्य केल्याचे समोर आले आहे. अश्लील कृत्य करणाऱ्या ५८ वर्षीय आरोपीला पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. आरोपी दारूखाना परिसरातील रहिवासी असून त्याच्याविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
तक्रारदार मुलगी 12 वर्षांची आहे. ती तिच्या दोन मैत्रिणींसह रविवारी रात्री जात होती. त्यावेळी त्यांना एका व्यक्तीने खुणावले.परिचित व्यक्ती वाटल्यामुळे त्या थांबल्या. त्यांनी पीडित मुलींकडे पाहून अश्लील कृत्य केले. त्यानंतर त्यांच्याकडे पाहून शिवीगाळ केली. या प्रकारामुळे तिन्ही मुली घाबरल्या आणि त्यांनी याबातची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली. त्यांनी सोमवारी या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे.