छत्तीसगड येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका तरुणाने आपल्या आईची कुऱ्हाडीने वार करत हत्या केली. त्याने खूप वेडा वार केल्याने आईचे तुकडे- तुकडे झाले होते. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर तो मृतदेहाजवळ कुऱ्हाड हातात घेऊन बसला आणि गाणी गात होता. काही वेळाने मातीशी तो खेळू लागला. आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी आरोपीला अथक प्रयत्नानंतर अटक केले आहे.
Thane News : कचऱ्यात फेकले मतदान कार्ड; रेतीबंदर खाडी परिसरातील खळबळजक घटना
नेमकं काय घडलं?
ही घटना छत्तीसगड येथील जशपूर जिल्ह्यातील कुनकुरी पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. आरोपीचे नाव जितराम यादव असे आहे. मृतकाचे नाव गुला बाई असे आहे. हत्येनंतर तो आईच्या मृतदेहाशेजारी बसून गाणी गुणगुणत राहिला. त्यानंतर मातीशी खेळात राहिला. जेव्हा गावकऱ्यांनी त्याचे हे कृत्य पहिले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. जो कोणी त्याला पकडण्यासाठी जात होता, तो कुऱ्हाड घेऊन त्याच्या मागे धावत होता. घटनेची माहिती मिळताच लोकांची मोठी गर्दी जमली. मृतदेहाशेजारी कुऱ्हाड घेऊन बसलेल्या आरोपीजवळ जाण्याचे धाडस कोणीही करत नव्हते. आरोपी ज्याला कोणालाही पाहत होता, त्याच्यावर कुऱ्हाड चालवायला सुरुवात करत होता. लोक घाबरून पळून जात होते. पोलिसांनीही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने खूप दहशत निर्माण केली.
https://www.instagram.com/reel/DN25Xs8wmZg/?utm_source=ig_web_copy_link
स्थानिक लोकांनी काय सांगितले?
स्थानिक लोकांनी सांगितले की, घटनेच्या वेळी घरातील इतर सदस्यही तिथे होते. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. शेजारांच्या मते, जीतराम केरळमध्ये काम करत होता. त्याच वेळी त्याची मानसिक स्थिती बिघडली होती. घरच्यांना जेव्हा त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याने कळले, तेव्हा दोन दिवसांपूर्वी ते त्याला कुनकुरीला घेऊन आले. जशपूरचे एसएसपी शशिमोहन सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक तपासणीत आरोपीची मानसिक स्थिती ठीक वाटत नाही. हे देखील शक्य आहे की त्याने कोणत्या प्रकारचे व्यसन केले असेल. अशा परिस्थितीत, वैद्यकीय तपासणीनंतरच काही ठोसपणे सांगितले जाऊ शकते. ते म्हणाले की, हत्येमागील कारणांची सर्व बाजूंनी तपासणी केली जात आहे. जीतरामने आपल्या आईची एवढ्या निर्घृणपणे हत्या का केली, हे चौकशी आणि वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होईल.
Crime News: दूर जाऊन सिगारेट प्या म्हणताच युवकांना राग आला अन्…: कामगारांसोबत नेमके काय घडले?