Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: बनावट कंपन्या स्थापन करून बुडविला तब्बल ४९६ कोटींचा जीएसटी; ‘DGGI’ तर्फे तक्रार, गुन्हा दाखल

GST News: डीजीजीआयने केलेल्या तपासात त्यांना सुरवातीला बनावट आधारकार्ड, बनावट पॅनकार्डच्या आधारे बनावट जीएसटी नंबर घेऊन कंपन्या स्थापन झाल्याची माहिती मिळाली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 01, 2025 | 04:22 PM
Crime News: बनावट कंपन्या स्थापन करून बुडविला तब्बल ४९६ कोटींचा जीएसटी; ‘DGGI’ तर्फे तक्रार, गुन्हा दाखल
Follow Us
Follow Us:

पुणे: बनावटी जीएसटी फर्म, बनावट आधार कार्ड, बनावट पॅनकार्डचा वापर करून 54 कंपन्या स्थापन करून तब्बल 496.27 कोटींचा जीएसटी बुडविल्याप्रकरणी डायरोक्टारेट जनरल ऑफ जीएसटी विभागाने (डिग्गी) दिलेल्या तक्रारीवरून कोरेगावपार्क पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिनेश कुमार (वय २६, रा. देवडा जालोर, राजस्थान) आणि विरेंद्र कुमार (वय २६, रा. मुर्तला गाला, बाडमेर, राजस्थान) अशी गुन्हा दाखल केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत डीजीजीआयचे पुणे विभागाचे विभागीय माहिती अधिकारी अनुराग श्रीवास्तव यांनी कोरेगाव पार्क पोलिसांत तक्रार दिली आहे.

डीजीजीआयने केलेल्या तपासात त्यांना सुरवातीला बनावट आधारकार्ड, बनावट पॅनकार्डच्या आधारे बनावट जीएसटी नंबर घेऊन कंपन्या स्थापन झाल्याची माहिती मिळाली होती. या कंपन्या मार्फत गुड्स आणि सर्व्हीस पुरवत असल्याचे भासवले जात होते. डीजीजीआय विभागाला यामध्ये काही तरी मोठा घोटाळा असल्याचा संशय आला. गोवा स्थित तीन कंपन्या आर. के. इंटरप्रायझेस, एस. के. इंटरप्रायझेस आणि महालक्ष्मी इम्पॅक्ट या कंपन्यामार्फत जीएसटी चुकविला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तपासात ह्या बनावट कंपन्या व त्या संबंधीत कंपन्याचा जीएसटी एकाच ठिकाणहून म्हणजे राजस्थान येथून भरला गेल्याचे निदर्शनास आले.

अधिक तपासामध्ये ही फसवणूक दिनेश कुमार नावाच्या एका आरोपीकडून होत असल्याचे निदर्शनास आले. तो राहुल कुमार नावाने ह्या कंपन्या चालवत असल्याचे नंतर तपासात समोर आले. त्याच्याकडे करण्यात आलेल्या अधिक तपासामध्ये त्याचा साथीदार विरेंद्र कुमार असल्याचे निदर्शनास आले. विरेंद्र हा कल्पेश कुमार नावाने बनावट कंपन्या चालवत असल्याचे निदर्शनास आले. अशा पध्दतीने त्यांनी तब्बल 54 बनावट कंपन्या स्थापन करून 496.27 कोटींचा कर बुडविला असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. हा सर्व प्रकार डिसेंबर 2020 ते ऑगस्ट २०२४ दरम्यान घडला असून गुन्ह्याचा तपास कोरेगाव पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला करत आहे.

हेही वाचा: Crime News: ‘आधी मोबाईल हिसकावला अन् तरुणाला थेट 300 फूट…’; हडपसर पोलिसांकडून स्नॅचर टोळीला अटक

आधी मोबाईल हिसकावला अन् तरुणाला थेट 300 फूट फरफटत नेले

पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावून त्याला ३०० फुटापर्यंत फरफटत नेणाऱ्या मोबाईल स्नॅचर टोळीला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेत पादचारी तरुण जखमी झाला होता. चोरट्यांकडून गुन्ह्यातील मोबाईल तसेच त्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्यांनी आणखीही काही गुन्हे केल्याची शक्यता आहे.

मंथन त्रिलोक पवार (वय १९, रा. मुंढवा), रोहीत किरण वाणी (वय २१) व कृष्णा संजय वाणी (वय २०) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी हडपसर पोलिसांत गुन्हा नोंद आहे. ही कारवाई परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे, निखील पवार व त्यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Gst worth rs 496 crores was embezzled by setting up fake companies pune crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 04:01 PM

Topics:  

  • Pune Crime

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…
2

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…
3

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड
4

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.