Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gujarat Crime: कारमधून बाहेर बोलावलं अन् चुलत भावावर केले 7 वार; तो मला मारणार होता…

गुजरातमधील राजकोट येथे चुलत भावाने 42 वर्षीय घनश्यामसिंह वाघेला यांच्यावर चाकूने सात वार करून हत्या केल्याची घटना घडली. कौटुंबिक वाद आणि कथित अनैतिक संबंधांच्या संशयातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक तपासात निष्कर्ष आहे. मुख्य आरोपी धर्मेंद्रसिंह वाघेला याला पोलिसांनी काही तासांत अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 04, 2026 | 03:03 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चुलत भावाने कारमधून बाहेर बोलावून 42 वर्षीय घनश्यामसिंह वाघेला यांच्यावर सात वार करून हत्या केली.
  • कौटुंबिक वाद आणि कथित अनैतिक संबंधांच्या संशयातून गुन्हा घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज.
  • फरार झालेल्या मुख्य आरोपीला काही तासांत अटक; साथीदाराचा शोध आणि पुढील तपास सुरू.
गुजरात: गुजरातमधील राजकोटमध्ये नात्यांना काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलत भावाने भररस्त्यात कारमधून बाहेर बोलावून ४२ वर्षीय व्यक्तीवर चाकूने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. कौटुंबिक वाद आणि कथित अनैतिक संबंधांच्या संशयातून हा रक्तरंजित हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, मुख्य आरोपीला काही तासांतच अटक करण्यात आली आहे.

काय नेमकं प्रकरण?

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव घनश्यामसिंह वाघेला (वय ४२) असे आहे. धर्मेंद्रसिंह वाघेला असे हत्या करणाऱ्या चुलत भाऊचा नाव आहे. याप्रकरणी भक्तिनगर पोलिसांनी तातडीने भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103 (1) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या मोठ्या भावाच्या पत्नीशी घनश्यामसिंह यांचे कथित अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरूनही दोन्ही कुटुंबांत मोठा तणाव होता. या वादातूनच आरोपीच्या भावाने आधीही घनश्यामसिंह यांच्यावर हल्ला केला होता आणि नंतर पत्नीला घटस्फोट दिला होता.

आली लहर केला कहर! 112 हेल्पलाईनवर खून झाल्याची माहिती; यंत्रणेला दमवणारा ‘तो’ कॉलर रडारवर

आरोपीने धर्मेंद्रसिंह याने गांधीग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये घनश्यामसिंह सतत फोन करून धमक्या देत असल्याचा आरोप केला होता. या भीतीपोटी आरोपीने आपले घरही बदलले होते. तसेच, हत्येच्या एक दिवस आधी घनश्यामसिंह यांनी धर्मेंद्रसिंह याला तब्बल 40 ते 50 मिस्ड कॉल्स केल्याचे तपासात समोर आले आहे. घटनेच्या दिवशी आरोपी आपल्या एका सहकाऱ्यासह ॲक्टिव्हावरून घनश्यामसिंह यांचा शोध घेत होता आणि अखेर त्यांनी गाठून ही प्राणघातक घटना घडवली.

हत्येमागचं कारण काय?

आरोपी हत्येनंतर फरार झाला होता. तो आधी अहमदाबाद आणि नंतर लिंबडीच्या दिशेने पळून गेला. भक्तीनगर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत अवघ्या काही तासांतच त्याला लिंबडी महामार्गावरून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता घनश्यामसिंह आपली हत्या करेल या भीतीनेच त्याने हा कट रचला असल्याचे समोर आले. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे.

शासकीय कामात अडथळा, मद्यधुंद तरुणाची पोलिसांना धक्काबुक्की; नेमकं काय घडलं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्तीचे नाव काय होते?

    Ans: घनश्यामसिंह वाघेला.

  • Que: मुख्य आरोपी कोण आहे?

    Ans: धर्मेंद्रसिंह वाघेला.

  • Que: हत्येमागील प्राथमिक कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: कौटुंबिक वाद आणि कथित अनैतिक संबंधांचा संशय.

Web Title: Gujarat crime called out of the car and stabbed cousin seven times he was going to kill me

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • crime
  • Gujrat
  • Gujrat Crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
3

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.